भाजप नेते सुरेंद्र सिंह (फोटो सौजन्य- ANI)

भारतीय जनता पार्टी (BJP) मधील एका नेत्याने काँग्रेस पक्षावर निशाणा साधत वादग्रस्त विधान केले आहे. भाजप नेते सुरेंद्र सिंह (Surendra Singh) यांनी काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना 'रावण' (Ravana) असून प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) 'शूर्पणखा'(Shurpanakha) असल्याचे म्हटले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे 'भगवान राम' (Bhagwan Ram) समान असल्याची उपमा दिली आहे. सिंह यांनी, 'राहुल गांधी रावण असून त्यांची बहिण प्रियांका गांधी हिला शूर्पणखा हिच्या भूमिकेत पाठवले आहे'.

टाईम्स नाऊ (Times Now) या वृत्तवाहिनीने सुरेंद्र सिंह यांना याबद्दल विचारले असता, उच्च दर्जाचे जीवन व्यथित करणारा व्यक्ती राम असू शकतो का? काँग्रेस त्यांना राम म्हणून सांगत फिरत होते. खरचं ते रामाच्या योग्यतेचे आहेत का असा सवाल सिंह यांनी उपस्थित केला. तसेच राजकरणात आता राहुल गांधी यांनी बहिणीचा समावेश केला आहे. थोड्या दिवसात त्यांच्या घरातील इतर मंडळींना सुद्धा राजकरणात सामील करा अशी टीका राहुल गांधी यांच्यावर सिंह यांनी केली आहे. (हेही वाचा-बिहार: गांधी मैदानात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झळकले 'भगवान राम' यांच्या रुपात, पोस्टरबाजीमुळे वादाचे वातावरण)

तर येत्या 3 फेब्रुवारी रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थित एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकरणी कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी उत्साहाचे वातावरण दिसून आले, ज्यामध्ये राहुल गांधी यांना भगवान राम यांचे रुप देण्यात आलेले आहे. या पोस्टरबाजीमुळे भाजप पक्षावर निशाणा साधला आहे. पोस्टरवर असे लिहिले आहे की, वे राम नाम जपते रहे,तुम राम बनकर जियो रे.

तसेच सुरेंद्र सिंह यांनी यापूर्वीसुद्धा वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यावेळी सिंह यांनी असे म्हटले होते की हिंदूंची लोकसंख्या वाढली पाहिजे. त्याचसोबत प्रत्येक विवाहित दांपत्याने कमीत कमी पाच मुले जन्माला घालून भारताला मजबूत केले पाहिजे. त्यामुळे भारतात हिंदुत्व कायम राहण्यास मदत होईल अशा पद्धतीचे वादग्रस्त विधान सिंह यांनी केले होते.