बिहारची राजधानी पटना (Patna) येथील गांधी मैदानात काँग्रेस पक्षाकडून 3 फेब्रुवारी रोजी 'जन आकांक्षा' नावाच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस (Congress) पक्षात खुप आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. तर गेल्या 28 वर्षातील ही प्रथम संधी असल्याने काँग्रेसने आपल्या बळावर एक भव्य रॅलीचे आयोजन केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) सुद्धा या रॅलीला उपस्थिती लावणार आहेत. या प्रकरणी कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी उत्साहाचे वातावरण दिसून आले, ज्यामध्ये राहुल गांधी यांना भगवान राम यांचे रुप देण्यात आलेले आहे. या पोस्टरबाजीमुळे भाजप पक्षावर निशाणा साधला आहे. पोस्टरवर असे लिहिले आहे की, वे राम नाम जपते रहे,तुम राम बनकर जियो रे.
कार्यकर्त्यांकडून झळकावलेल्या पोस्टरवर भगवान राम यांच्या रुपात राहुल गांधी दिसून येत आहेत. तर प्रियांका गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि अन्य काँग्रेस नेत्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. पटना येथील भव्य रॅलीसाठी ठिकठिकाणी शहरात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांकडून या पोस्टरबाजीमुळे टीका केली जात आहे. (हेही वाचा-काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली गोवा मुख्यमंत्र्यांची भेट)
Bihar: Congress President Rahul Gandhi portrayed as Lord Ram on a poster in Patna. pic.twitter.com/La4ZcL64GY
— ANI (@ANI) January 29, 2019
जेडीयू पक्षाचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी या पोस्टरबाजीला 2019 मधील आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खेळी केली जात असल्याचे म्हटले आहे. तसेच काँग्रेस हिंदूकडून मत मिळविण्यासाठी त्यांनी ही युक्ती केली आहे. त्याचसोबत आधीच एक पक्ष या मार्गावर असताना काँग्रेस पक्षाला कोण जवळ करणार आहे. नीरज कुमार यांनी सुद्धा हे कोणते भगवान राम आहेत जे अनंत सिंह यांसरख्या लोकांची मदत घेत आहेत.