धर्म परिवर्तन थांबवण्यासाठी नवा कायदा लागू करण्याच्या तयारीत मोदी सरकार, संसदेच्या पुढील सत्रात विधेयक मांडण्याची शक्यता
मोदी मंत्रीमंडळ (फोटो सौजन्य-PIB)

धर्म परिवर्तन (Religious Conversion)  थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार पुढील संसदेत एक विधेक मांडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मोदी सरकार धर्मांतर करण्याच्या विरोधात एक विधेयक तयार करण्याच्या तयारीत आहेत. जर परिस्थिती ठिक असल्यास हे विधेयक संसदेत सादर करण्यात येणार आहे.

झी न्यूज (Zee News) यांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारने धर्मांतर करण्याच्या विरोधात विधेयक तयार करण्यासाठी सुरुवात केली असून त्यावर अधिक चर्चा केली जात आहे. असे सांगितले जात आहे की, विधेयकाच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाला आळा बसू शकणार आहे. मात्र अद्याप या विधेयाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-कश्मीर वासियांना शुभेच्छा देत व्यक्त केल्या देशाबद्दल भावना)

मोदी सरकारचे हे पाऊल संसदेचे बजेट सत्र संपल्यानंतर लगेच समोर आले आहे. राज्यसभेत बुधवारी बजेट सत्रात 31 विधेयक मंजूर करण्यात आले. यामध्ये जम्मू-कश्मीर विभाजन विधेयक 2019, मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) विधेयक 2019 सामील करण्यात आले आहे. तिहेरी तलाक हे विधेयक मंजूर झाल्यांतर आता आरोपीला शिक्षा होणार आहे. त्याचसोबत कलम 370 जम्मू-कश्मीर मधून हटवल्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर या दोन राज्यांचा विशेष दर्जा काढून टाकण्यात आला आहे.