Shahnawaz Hussain, Shatrughan Sinha, Lal Krishna Advani | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Loksabha Elections 2019: लोकसभा निवडणूक उमेदवार तिकीट वाटप करत असताना भारतीय जनता पक्ष (BJP) श्रेष्टींनी विद्यमान खासदार आणि नेत्यांना जोरदार दणका दिला आहे. पक्षनेतृत्वाने भाजप ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani), शत्रुघ्न सिन्हा(Shatrughan Sinha), शहानवाज हुसेन (Shahnawaz Hussain) यांच्यासह अनेक दिग्गजांचे तिकीट कापले आहे. तर, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, गिरिराज सिंह यांच्यासारख्या चर्चित चेहऱ्यांचे मतदारसंघ बदलले आहेत.

शहानवाज हुसेन यांच्यावर पक्षश्रेष्टींची खप्पामर्जी?

प्राप्त माहितनुसार, भाजपने आतपर्यंत जाहीर केलेल्या उमेदवार यादीमध्ये विद्यमान खासदार, लालकृष्ण आडवाणी, शत्रुघ्न सिन्हा, शहानवाज हुसैन याच्यासारख्या भाजपच्या महत्त्वाच्या आणि चर्चित चेहऱ्यांची नावे नाहीत. लाकृष्ण आडवाणी गेली अनेक वर्षे लढत असलेल्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून या वेळी भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह रिंगणात आहेत. तर, पटना साहिब लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना पक्षाने रिंगणात उतरवले आहे. अभिनेता शत्रुघ्न सिन्हा हे पटना साहिब लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. मात्र, उमेदवार यादीनुसार त्यांचा पत्ता कापण्यात आला आहे. भाजप प्रवक्ते राहिलेल्या शहानवाज हुसेन यांच्यावरही बहुदा पक्षश्रेष्टींची खप्पामर्जी झाली असावी. भाजप उमेदवार यादिमध्ये शहानवाज हुसेन यांचेही नाव नाही. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये ते भागलपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे अधिकृत उमेदवार होते. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: भाजप संस्थापक लालकृष्ण आडवाणी यांचे गांधीनगर येथून तिकीट कापण्याची चर्चीत कहाणी)

तिकीट आणि मतदारसंघ आदलाबदलीवरुन भाजपमध्ये नाराजी

दरम्यान, तिकीट कापल्याबद्दल तसेच, मतदारसंघांची आदलाबदल केल्यबद्दल भाजपच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी केवळ तिकीट कापले किंवा मतदारसंघ बदलला म्हणून नव्हे तर, निवडणुकीच्या तोंडावर आयत्या वेळी बाहेरील पक्षातील आयात उमेदवाराला पक्षाने तिकीट दिले म्हणूनही आहे. निवडणुकीच्या तोंडावर देशभरामध्ये भाजपने विरोधी पक्षांतील अनेक नेते आणि त्यांच्या नातेवाईकांना पक्षात प्रवेश दिला आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election 2019: भाजप VVIP उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ; नरेंद्र मोदी, अमित शाह रिंगणात)

महाराष्ट्रातही भाजपने अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले

महाराष्ट्रातही भाजपने अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले आहे. पुण्यातील विद्यमान खासदार अनिल शिरोळे, सोलापूरचे शरद बनसोडे, जळगावचे ए. टी. पाटील आणि दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांचा समावेश आहे. या खासदारांच्या जागी आता जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांचन कुल आणि सोलापूरमधून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी हे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला नाराजांचा फटका बसतो की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.