BMC Election 2022: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने 25 समितीची केली घोषणा, आशिष शेलार करणार नेतृत्व
Ashish Shelar And BMC (Photo Credit - PTI, FB)

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election 2022) भाजपने आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांच्याकडे निवडणूक संचलन समिती अध्यक्षपदाची जबाबदार मोठी जबाबदारी सोपवली आहे. महापालिकेची भरभराट करण्यासाठी भाजपची पूर्ण ताकद लावली जात आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता मुंबई निवडणुकीसाठी समित्या स्थापन केल्या आहेत. त्यात निवडणूक समितीसह 25 समित्या आहेत. या प्रत्येक समितीचे अध्यक्ष व सदस्यांची नावे नमूद करण्यात आली. यामध्ये आमदार आशिष शेलार यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडणूक समितीचे अध्यक्षपद भाजप नेते व आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असून या निवडणुकीच्या समितीमध्ये मनोज कोटक आणि किरीट सोमय्या हे विशेष अमंत्रित असणार आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबई महापालिकेच्या तयारीबाबत चर्चा करून शुक्रवारी रात्री 25 समित्यांच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नावांची घोषणा केली. आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे माध्यम विभाग समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असून, प्रशासन समन्वयक म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आचार्य पवन त्रिपाठी आणि अमदास विद्या ठाकूर यांना विशेष संपर्क प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. महिला संपर्क समितीच्या प्रभारी शलाका साळवी आणि शीतल गंभीर, यात्रा कार्यकर्ता समितीचे प्रभारी संजय पांडे असतील. (हे ही वाचा Mumbai: दोन वर्षाच्या मुलीची वडिलांकडून हत्या, आरोपीला बायकोच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या)

समितीचे नाव, प्रमुख आणि समितीच्या सदस्यांची नावे खालीलप्रमाणे :

निवडणूक संचालन समिती

आशिष शेलार, अध्यक्ष

राहुल नार्वेकर

कालिदास कोळंबकर

प्रकाश मेहता

नितेश राणे

पुनम महाजन

जाहिरनामा समिती

पुनम महाजन, अध्यक्ष

योगेश सागर, सचिव

सुनील राणे

आर. यू. सिंह

राजहंस सिंह

प्रभाकर शिंदे

प्रशासन समन्वय समिती

प्रविण दरेकर

प्रसार माध्यम आणि समाज माध्यम समिती

अतुल भातखळकर, अध्यक्ष

राम कदम

अमरजीत मिश्रा

विवेकानंद गुप्ता

झोपडपट्टी संपर्क समिती

गोपाळ शेट्टी

आर. डी. यादव

तृप्ती सावंत

संसाधन समिती

मनोज कोटक

आरोपपत्र समिती

अमित साटम, अध्यक्ष

भालचंद्र शिरसाट

विनोद मिश्रा

बाह्य प्रसिद्धी समिती

पराग अळवणी

प्रसिद्धी सामुग्री व्यवस्थापन समिती

मिहिर कोटेचा

पराग शाह

बुथ संपर्क समिती

संजय उपाध्याय

निवडणूक आयोग संपर्क समिती

प्रकाश मेहता

कृपाशंकर सिंह

ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क समिती

भाई गिरकर

जाहीर सभा समिती

प्रसाद लाड

वॉर रुम समिती

प्रतिक क्रर्पे

ओबीसी संपर्क समिती

मनिषा चौधरी

उत्तर भारतीय संपर्क समिती

आर. यू. सिंह

जयप्रकाश ठाकूर

अमरजित सिंह

जयप्रकाश सिंह

ज्ञानमूर्ती शर्मा