PM Narendra Modi (Photo Credits-ANI Twitter)

केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) अयोध्या राम मंदिर उभारणी प्रकरणी ट्रस्टची स्थापना केली आहे. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधावारी याबाबत घोषणा करत 'श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र' (Sri Ram Janambhoomi Tirath Kshetra) असे ट्रस्टचे नाव ठेवल्याचे स्पष्ट केले आहे. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुन्नी वफ्फ बोर्ड यांना 5 एकर जमीन देण्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते. मोदी यांच्या निर्णयाचे आज पुन्हा स्वागत करण्यात आल्यानंतर भाजप आमदारांनी जय श्रीरामाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. राम मंदिर ट्र्स्टसाठी निर्मोही आखाडा, दिगंबर आखाडा आणि रामल्ला विराजमान मधील एक-एक सदस्याची निवड करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षात 9 नोव्हेंबरला देशातील सर्वात मोठ्या न्यायालयाने अयोध्या जन्मभुमी वाद प्रकरणी राम मंदिराच्या पक्षात निर्णय सुनावला होता. त्यावेळी मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट बनवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने यासाठी केंद्रातील मोदी सरकारला याची जबाबदारी दिली होती.(राम मंदिर: व्यापार मंडळाचा विश्व हिंदू परिषदेच्या धर्म सभेला विरोध; उद्धव ठाकरेंना दाखवणार काळे झेंडे)

ANI Tweet:

रिपोर्टनुसार, नरेंद्र मोदी लवकरच राम मंदिर निर्माण प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टसाठी सदस्यांची नावे घोषित करण्याची शक्यता आहे. राम जन्मभूमी वाद प्रकरणी सु्प्रीम कोर्टाने निर्णय सुनावल्यानंतर 87 दिवसानंतर ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेला कालावधी 9 फेब्रुवारीला संपणार आहे.