Arun Jaitley Birth Anniversary:अरुण जेटली यांच्या मरणोत्तर पहिल्या जयंती निमित्त दिल्ली व पटना येथे कार्यक्रमाचे आयोजन; भाजप नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
Senior BJP Leader, Former Union Finance Minister Arun Jaitley | (Photo Credits: Twitter)

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांची आज मरणोत्तर पहिली जयंती आहे. २४ ऑगस्ट 2019 रोजी वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी दिल्ली येथील AIIMS रुग्णालायत प्रदीर्घ आजारानंतर शेवटचा श्वास घेतला होता. आज त्यांच्या जन्मदिनाच्या औचित्यावर या तल्लख नेतृत्वाच्या स्मरणार्थ दिल्ली व पटना येथे खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या हस्ते पटना येथे जेटली यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे तर दिल्ली येथे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांच्या हस्ते जेटली यांच्या आयुष्यावर लिखित 'The Renaissance Man- Many Faceats Of Arun Jaitley' या पुस्तकाचे अनावरण होईल. याशिवाय अरुण जेटली यांच्या जयंती निमित्त अभिवादन करत ट्विटर वर देखील अनेक नेत्यांनी त्यांचे स्मरण केले आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस, सुरेश प्रभू, चंद्रकांत पाटील , माजी क्रिकेटर व खासदार गौतम गंभीर यांनी आज अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहताना काही खास पोस्ट केल्या आहेत. यासोबतच अनेक जनसामन्यांनी देखील जेटली यांच्या स्मृतीस अभिवादन केले आहे. (Arun Jaitley यांनी केंद्रीय अर्थमंत्री पदी घेतले होते हे '6' मुख्य निर्णय)

पहा ट्विट

दरम्यान, अरुण जेटली यांची राजकीय कारकीर्द बरीच प्रदीर्घ होती 1991 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. 1999 मध्ये त्यांच्यावर भाजप पक्ष प्रवक्ता पदाची जबाबदारी आली.अटल बिहारी सरकारमध्ये जेटली यांनी 13 ऑक्टोबर 1999 मध्ये माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार हाती घेतला. 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्म मध्ये त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. नोटबंदी, जीएसटी हे त्यांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेशी संबंधीत सर्वात मोठे निर्णय ठरले