मध्य प्रदेशात BJP सत्ता स्थापन करणार नाही, शिवराज सिंह यांचा राजीनामा
शिवराज सिंह चौहान (फोटो सौजन्य- ANI)

Madhya Pradesh Assembly Election Result 2018: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) भाजप (BJP) सरकारने सत्ता स्थापन करण्यास नकार दिला असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी दिली. तसेच आज राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. चौहान यांनी तब्बल 15 वर्षानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच राजीनामा देण्यापूर्वी  पत्रकार परिषदेमध्ये हे मतं त्यांनी स्पष्ट केले.

राजीनामा दिल्यानंतर चौहान यांनी पत्रकारांना उत्तर देत, 'आता मी मुक्त आहे. मी माझा राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली असून झालेल्या पराभवाची जबाबदारी माझी' असल्याचे सांगितले आहे.

तर मध्य प्रदेशात राज्यपाल आनंदीबेल पटेल (Anandiben Patel) यांना काँग्रसला भेटण्यास बोलावले आहे. या भेटीदरम्यान सत्ता स्थापनेवर चर्चा होणार असल्याचे समोर येत आहे. तर काँग्रेसकडून शिष्टमंडळात कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंह आणि विवेक तन्खा यांचा समावेश असणार आहे.