Asaduddin Owaisi | (Photo Credits: Facebook)

उत्तर प्रदेश (UP Election 2022) विधानसभा निवडणुकीदरम्यान (AIMIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या वाहनावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती हापूडचे एसपी (SP Hapur) यांनी दिली आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून, त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. एसपी दीपक भुकर (SP Deepak Bhukar) म्हणाले की, अधिक तथ्य समोर आल्यावर आम्ही तुम्हाला अपडेट करू. आतापर्यंत कोणीही जखमी झाले नाही. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. या हल्ल्यानंतर दिल्लीत असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, मी निवडणूक आयोगाला या गोळीबाराच्या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश देण्याची विनंती करतो. स्वतंत्र तपास करण्याची जबाबदारी यूपी सरकार आणि मोदी सरकारची आहे. याबाबत मी लोकसभा अध्यक्षांनाही भेटणार आहे.

Tweet

यूपी एडीजी कायदा आणि सुव्यवस्था यांनी या प्रकरणी सांगितले की, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी व्हिडिओ फुटेज आपल्या ताब्यात घेतले आहे. या घटनेप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 9 मिमीचे अवैध पिस्तूल जप्त करण्यात आले. आम्ही व्हिडिओ फुटेज तपासत आहोत. पाच पथके तयार करण्यात आली असून ते अधिक तपास करत आहेत. येथे यूपी पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की असदुद्दीन ओवेसीच्या हल्लेखोरांची (एक अटक, दुसऱ्याला ताब्यात घेतले) चौकशी सुरू आहे. ओवेसी यांच्या हिंदुत्वविरोधी वक्तव्यामुळे दुखावल्यानंतर आपण ही कारवाई केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. (हे ही वाचा Indian Digital Rupee: आरबीआय लवकरच लॉन्च करणार डिजिटल रुपया, केंद्रीय अर्थकंल्पात निर्मला सीतारमण यांची घोषणा)

पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारीला होणार मतदान

हैदराबादचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष यूपीमध्ये भागीदारी परिवर्तन मोर्चासोबत एकत्र निवडणूक लढवत आहे. ओवेसी स्वतः आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रणांगणात उतरले आहेत. उत्तर प्रदेशात ७ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. याअंतर्गत 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत मतदान होणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.