PNB घोटाळा: नीरव मोदीला धक्का; ४ देशांतील ६३७ कोटींची संपत्ती जप्त
नीरव मोदी (Photo Credits: Facebook/File)

पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळा प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या नीरव मोदीला जोरदार दणका मिळाला आहे. भारतासह जगभरातील चार देशांमधून मोठी कारवाई करत नीरव मोदी आणि परिवारातील ६३७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यात त्याच्या प्रॉपर्टी आणि बँक अकाऊंट्सचा समावेश आहे.

प्रव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA)अंतर्गत इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट ((ED)ने न्यू यॉर्क (अमेरिका)मध्ये नीरव मोदीच्या २१६ कोटी रुपया किमतीच्या २ स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.

अब्जाधीश ज्वेलर नीरव मोदी आणि त्याचे मामा मेहुल चोक्सीने PNB मध्ये सुमारे १४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. तसेच, हा घोटाळा उघडकीस येताच दोघांनीही देशाबाहेर पळ काढला.