नरेंद्र मोदी यांच्या जबऱ्या फॅनची अनोखी स्कीम, मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेईपर्यंत प्रवाश्यांना देणार मोफत रिक्षा प्रवास
PM Narendra Modi's Fan offers free autorickshaw rides to Haldwani residents (Photo Credits: ANI)

एकीकडे लोकसभा निवडणुकीत (Loksabha Elections) नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला (BJP)  ऐतिहासिक यश प्राप्त झालं, आणि दुसरीकडे आनंद सोहळ्याला सुरवात झाली. नरेंद्र मोदींचे समर्थक आपापल्या परीने आपल्या नेत्याच्या यशाचा आनंद साजरा करत आहेत. मोदींचा असाच एक जबरा फॅन डेहराडून (Dehradun) येथे पाहायला मिळाला. निकालानंतर जमुना प्रसाद (Jamuna Prasad) हा रिक्षा चालक इतका खुश झाला की त्याने हळदवानी परिसरातील रहिवाश्यांना चक्क मोफत रिक्षा सेवा द्यायला सुरवात केलीय, इतकंच नव्हे तर 30 मे ला मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेईपर्यंत ही सेवा चालू ठेवणार असल्याचेही जमुना याने सांगितले.

जमुना प्रसाद यांनी अर्ध्यावरच शाळा सोडली होती मात्र "नरेंद्र मोदी हे नेहमीच आपल्या कामाने मला व माझ्यासारख्या लाखो युवकांना काहीतरी मोठे करून दाखवण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे आता बहुमत मिळवलेले मोदीच पुन्हा पंतप्रधान पदे विराजमान होणार असल्याचा मला खूप आनंद झाला आहे, मोदी नेहमीच सर्वांचा विचार करतात त्यामुळे ते पंतप्रधान पदाचा ताबा घेईपर्यंत मी मोफत रिक्षा सेवा पुरवून माझा आनंद साजरा करणार असल्याचे" जमुना प्रसाद यांनी ANI शी बोलताना सांगितले आहे.

ANI ट्विट

नरेंद्र मोदी 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेणार, राष्ट्रपती भवनात सोहळा पार पडणार

नरेंद्र मोदींच्या विजयाचा आनंद अशा प्रकारे साजरा करणारे अन्य अनेक फॅन्स निकालानंतर पाह्यला मिळाले आहेत. डेहराडून मधील मुरारी चामोली नामक चहा विक्रेत्याने निकालाच्या दिवशी पर्यटकांना मोफत चहा वाटप केले, तर एका चाट स्टॉल वर सर्वांना मोफत चाट देखील वाटण्यात आले होते.

2014 पेक्षा देखील जास्त जागा स्वबळावर मिळवतात भाजपाने लक्षणीय विजय आपल्या नावे केला आहे, या विजयनानंतर आता येत्या 30 मे ला नरेंद्रा मोदी व त्यांचे नवनिर्वाचित मंत्रिमंडळ राष्ट्रपती भवनात येत्या पाच वर्षांच्या सत्तास्थापनेचे शपथ घेणार आहेत.