PM Narendra Modi Tweet: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी आला सुंंदर पाहुणा, ट्विट करुन शेअर केला नयनरम्य व्हिडिओ
PM Narendra Modi With Peacock (Photo Credits: Twitter)

पंंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांंच्या दिल्ली (Delhi) येथील निवासस्थानी आज वर अनेक राजकीय मंंडळींची वर्दळ होतानाचे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहिले असतील पण आज स्वतः मोदींनी एक खास व्हिडिओ शेअर करुन आपल्या भेटीला आलेल्या एका सुंदर पाहुण्यांंची ओळख करुन दिली आहे. हा पाहुणा म्हणजे कोणी व्यक्ती नसुन चक्क एक मोर (PM Modi With Peacock)  आहे. हो, मोदींच्या भेटीसाठी आलेल्या या मोराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, काही वेळापुर्वीच हा व्हिडिओ आणि सोबत एक अत्यंत सुंंदर कविता कॅप्शन म्हणुन लिहित मोदींंनी आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केली आहे.

या व्हिडिओ मध्ये मोदी व्यायाम करताना, प्रातःफेरी करताना पिसारा फुलवुन चालणारा मोर पाहायला मिळतोय, तर मोदी या मोराला खाउ घालताना सुद्धा दिसत आहेत, मोर हा स्वतः च एक सुंंदर जीव म्हणुन ओळखला जातो अशात पंंतप्रधानांच्या घराबाहेरील नयनरम्य हिरवळीच्या वातावरणात त्याचं सौंदर्य अधिकच खुलुन आलंंय म्हणण्यास हरकत नाही, सोबतच मोदींनी शेअर केलेली कविता भोर भयो, बिन शोर, ही वाचुन सुद्धा तुमच्यातील साहित्यप्रेमी जागा होईल यास शंका नाही.

नरेंद्र मोदी ट्विट

दरम्यान, पंंतप्रधानांच्या शासकीय बंंगल्यात मोदींनी एक खास चबुतरा म्हणजेच पार सुद्धा बांधुन घेतला आहे जिथे पक्षांंना घरटी बांधण्यासाठी सोय केलेली आहे. लोक कल्याण मार्गावर स्थित या पंंतप्रधान बंगल्यात अनेकदा मोदींंच्या भेटीसाठी मोर येत असतात त्यात पहिल्यांदाच मोदींंनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.