Smoking In Flight Bathroom: एअर इंडियाच्या लंडन-मुंबई प्लाईटमध्ये प्रवाशाचे गैरवर्तन; बाथरूममध्ये धुम्रपान केल्याप्रकरणी अमेरिकन नागरिकावर गुन्हा दाखल
Air India Flight (PC - Wikimedia Commons)

Smoking In Flight Bathroom: विमान प्रवासादरम्यान प्रवाशांकडून त्यांच्या सहप्रवाशांसोबत अयोग्य वर्तन केल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांत पहायला मिळत आहेत. त्याचबरोबर विमानातील प्रवाशांकडून अनेक वेळा नियमांचे उल्लंघन केले जाते. यासोबतच फ्लाइट अटेंडंटसोबत झालेल्या भांडणाचे व्हिडिओही अनेकवेळा पाहायला व्हायरल होत आहेत. एअर इंडियामध्ये पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लंडनहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या (Air India Flight) टॉयलेटमध्ये 37 वर्षीय व्यक्ती धूम्रपान करताना पकडली गेली. या प्रकरणी आरोपी रत्नाकर करुणकांत द्विवेदी याच्यावर संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर द्विवेदी यांनी सर्व क्रू मेंबर्सवर आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला कसेतरी पकडून सीटवर बसवले. पण त्याने सीटवर बसण्यास नकार दिला. यानंतर त्यांनी फ्लाइटचे गेट उघडण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पाहून विमानातील प्रवासी घाबरले. परिणामी आरोपीचे हात पाय बांधून त्याला सीटवर बसवण्यात आले. (हेही वाचा - प्रवाशाने उघडला विमानाचा आपत्कालीन दरवाजा, Indigo Flight मध्ये उडाला गोंधळ)

याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, जेव्हा त्याला सीटवर बसवले गेले तेव्हा तो थांबला नाही. तो त्याच्या डोक्यात वार करू लागला. यानंतर फ्लाइटमधील लोकांनी डॉक्टरांचा शोध सुरू केला. यानंतर आरोपीने बॅगेतून गोळी काढून त्याला द्या, असे सांगितले. मात्र लोकांनी त्याची बॅग तपासली असता त्याच्या बॅगेत औषध सापडले नाही. त्याऐवजी सिगारेटचा बॉक्स मिळाला. विमान उतरताच सहार पोलिसांनी आरोपीला अटक केली.

आरोपी भारतीय वंशाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. पण तो अमेरिकेचा नागरिक असून त्याच्याकडे अमेरिकेचा पासपोर्टही आहे. आरोपीच्या वैद्यकीय चाचणीसाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यावरून प्रवासादरम्यान ती व्यक्ती दारूच्या नशेत होती की मानसिक त्रासदायक होती, हे तपासले जाणार आहे.