
Jharkhand Shocker: झारखंडच्या पलामूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हैदरनगर येथील करीमंदीह गावात ह्रदय पिटाळून टाकणारी घटना घडली आहे. घरगुती वादातून एका महिलेने आपल्या तीन चिमुकल्या मुलांना तलावात फेकून दिले. यानंतर त्याने स्वतः उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेत आई आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. सुदैवाने एका मुलाचा जीव वाचला आहे. निर्मला देवी असे मृत महिलेचे नाव आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, महिला सासूच्या नेहमीच्या वादाला कंटाळून तीनं टोकाचे पाऊल उचलले आहे.लाडली कुमारी (८ वर्षे) आणि करण कुमार (६ वर्षे) अशी नदीत बुडून मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. त्याचवेळी गावकऱ्यांनी 4 वर्षांचा मुलगा गुड्डू कुमारला तलावात बुडण्यापासून वाचवले. मृत महिला निर्मला देवी हिचा पती जवाहिर राम हा चार दिवसांपूर्वी सिकंदराबाद येथे मजुरीच्या कामासाठी गेला होता. पती कमावण्यासाठी बाहेर जाताच महिलेचे सासू-सासरे आणि इतर कुटुंबीयांशी वाद होऊ लागले. यानंतर संतापलेल्या निर्मलाने तिच्या तीन चिमुकल्या मुलांसह तलावात उडी घेतली.
या घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हैदर नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. पोलीस अधिकारी या प्रकरणाच्या तपास करत आहेत. या घटनेनंतर करीमंडीह गावात मोठी खळबळ उडाली आहे.