Pakistan Flight Crash: पाकिस्तान येथील विमान अपघात दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख
PM Narendra Modi (Photo Credits-ANI)

पाकिस्तान (Pakistan)  येथे आज एक मोठी विमान अपघाताची दुर्घटना घडली आहे. लाहौर येथून कराचीकडे जाणाऱ्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स (PIA) या विमानाताल अपघात झाला आहे. पाकिस्तानच्या मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, विमान कराची विमानतळाजवळील रहिवाशी परिसरात पडले. विमान पडल्याने काही घरांना आग सुद्धा लागल्याचे दिसून आले. हा अपघात कराची विमानतळावर विमान लॅंडिग होण्यापूर्वी घडला आहे. यामध्ये 90 पेक्षा अधिक जण प्रवास करत होते. या प्रकरणी अद्याप किती जण जखमी आणि मृत्यूमुखी पडल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या प्रकरणी ट्वीट करत पाकिस्तान मधील विमान दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, विमान अपघातात मृत्यू झालेल्यांबाबत दु:ख झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या बद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींना लवकरात लवकर दुखापती मधून बरे व्हावेत अशी इच्छा करतो असे मोदी यांनी म्हटले आहे.(Pakistan Flight Crash: पाकिस्तानमध्ये लाहोरहून कराचीला जाणारे विमान A-320 झाले क्रॅश; 90 हून अधिक लोक करत होते प्रवास Watch Video)

तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सुद्धा विमान दुर्घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे. पीआयएचे सीईओ अरशद मलिक यांच्या संपर्कात असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आल्याचे इमरान खान यांनी म्हटले आहे. तर विमान दुर्घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यामध्ये दुर्घटनास्थळी आगीचे लोट पहायला मिळत असून रुग्णवाहिका आणि अधिकाऱ्यांनी तेथे उपस्थिती लावल्याचे दिसून आले आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, विमानाचे लँडिंग होण्यापूर्वी 10 मिनिटांपूर्वी त्याचा संपर्क तुटल्याचे सांगण्यात आले आहे.