पाकिस्तान विमान अपघात (Photo Credits: Twitter)

पाकिस्तानमध्ये (Pakistan) एक मोठा विमान अपघात (Flight Accident) झाल्याची माहिती मिळत आहे. लाहोरहून कराचीला (Lahore to Karachi) जाणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (Pakistan International Airlines) च्या विमानाला हा अपघात झाला आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार, हा अपघात कराची विमानतळाजवळ, विमान कराचीमध्ये उतरण्यापूर्वी झाला आहे. मालीरमधील मॉडेल कॉलनीजवळील जिना ग्राऊंड भागात हे विमान क्रॅश झाले. विमानात 98 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. 8303 क्रमांकाच्या या फ्लाइटमध्ये 200 पेक्षा जास्त प्रवासी वाहून नेण्याची क्षमता होती. या घटनेत किती लोक जखमी झाले आहेत आणि किती लोक मृत्युमुखी पडले आहेत, याबद्दल काही माहिती मिळालेली नाही.

एएनआय ट्वीट -

रिपोर्ट्सनुसार, विमानतळावर विमान उतरण्याच्या अवघ्या एक मिनिटा आधी विमांशी संपर्क तुटला. पीआयएचे प्रवक्ता अब्दुल सत्तार यांनी अपघाताची पुष्टी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फुटेजमध्ये क्रॅश साइटवरून धुराचे लोट बाहेर पडत असलेले दिसत आहे. हा अपघात निवासी भागात झाला असल्याने, काही घरांचे नुकसानही झाले आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरसमुळे जागतिक कार्बन प्रदूषणात 17% घट; दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच इतके कमी झाले Pollution)

विमान अपघात -

या अपघातामधील लोकांची मदत करण्यासाठी रुग्णवाहिका व बचाव अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. आंतर-सेवा पब्लिक रिलेशन (आयएसपीआर) च्या निवेदनात म्हटले आहे की, नागरी प्रशासनासह लष्कराची रॅपिड रिस्पॉन्स फोर्स आणि सिंध पाकिस्तान रेंजर्स मदत आणि बचाव प्रयत्नांसाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या या विमान अपघाताबाबत पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ट्वीट करत दुःख व्यक्त केले आहे. तसेच अल्लाह या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या आत्म्याला शांती देओ अशी प्रार्थनाही केली आहे.