
Yamuna Accident: उत्तर प्रदेशातील नोएडाजवळ एक्स्प्रेस वेवर आज एक भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. कारला एका वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडून आला आहे. या अपघातातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा अपघात 21 ऑक्टोबरच्या मध्यरात्री झाला.
पोलिसांनी मृतदेह श्वविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. अपघातात मृत्यू झालेले पाच जण एकाच कुटूंबातीस सदस्य होते. ते झारखंड मधील पलामू येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली. उपेंद्र बैठा, बिजेंद्र बैठा, कांती देवी, कुव ज्योती आणि सुरेश अशी मृतांची नावे आहेत. उपेंद्र बैठा आणि बिजेंद्र बैठे हे भाऊ आहेत. कांती देवी या बिजेंद्र बैठा यांच्या पत्नी आहेत. कुव ज्योती, ज्यांचे वय 12 वर्षे आहे, ही बिजेंद्र बैथा यांची मुलगी होती. या अपघातात जीव गमावलेल्या सुरेशचे वय 45 वर्ष असल्याचे सांगण्यात येत असून, श्रीकांत कामत बैठे असे त्याच्या वडिलांचे नाव आहे.
पोलीसांनी अपघाताची माहिती कुटुंबियांना दिली आहे. जखमी मुलांवर कैलास रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी झालेल्यांपैकी तिघेही लहान मुले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.