ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (Human Metapneumo) म्हणजेच एचएमपीव्ही (HMPV) या विशाणूजन्य संसर्गामुळे चीनमध्ये अनेक नागरिकांना प्रकृतीच्या समस्या निर्माण झाल्याचे वृत्त आहे. ज्यामध्ये श्वसनासंबंधी आजर बळावत आहेत. सोशल मीडियावर या नव्या आजाराबाबत उलटसुलट चर्चा असून, त्याची थेट तुलना COVID-19 या विषाणुशी केली जात आहे. कोविड-19 म्हणजेच कोरोना (Coronavirus) महामारीनंतर पाच वर्षांनी ह्युमन मेटाप्यूमोव्हायरस (What Is HMVP Virus) सह श्वसनासंबंधीच्या आजारांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याने चीन त्रस्त असल्याच्या वृत्तानंतर, या तुलनात्मक चर्चा अधिक वाढल्या आहेत. म्हणूनच जाणून घ्या एचएमव्हीपी व्हायरस म्हणजे काय? तो Covid-19 विषाणूसारखाच धोकादायक आहे का?
एचएमपीव्ही (HMPV) म्हणजे काय?
एचएमपीव्ही आजारामुळे चीनमधील रुग्णालये भरुन गेल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. असे असले तरी, कोणतीही अधिकृत आणीबाणी जाहीर करण्यात आलेली नसली तरी आरोग्य अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत असे इंटरनेटवरील अनेक अहवाल सांगत आहे. ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस म्हणजे नेमके काय?
ह्युमन मेटाप्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक श्वसन विषाणू आहे जो प्रामुख्याने सर्दीसारखी लक्षणे निर्माण करतो, जसे कीः
- खोकला ताप
- वाहणारे किंवा चोंदलेले नाक
- घसा खवखवणे
- डोके जड होणे
- श्वास किंवा दम लागणे
वरीलपैकी सर्वसाधारण सर्दीची वाटावी अशी लक्षणे साधारण असली तरी, वेळीच लक्ष न दिल्यास ती, न्यूमोनिया, ब्रॉन्कायटिस किंवा दमा आणि सीओपीडीची तीव्रता यासारख्या गुंतागुंती निर्माण करु शकतात, असे अभ्यासक सांगतात. (हेही वाचा, Human Metapneumovirus: कोरोना व्हायरसनंतर आता चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस चा प्रकोप; अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा, जाणून घ्या सविस्तर)
एचएमपीव्ही अधिकधोकादायक कोणासाठी?
सर्वसाधारणपणे विशाणूजन्य साथी आपल्यासाठी नव्या नाही. भौगोलिक स्थान, प्रदेश आणि वातावरणातील बदलांमुळे जगाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात नेहमीच कोणतीतरी साथ सुरु असते. विषाणू डोके वर काढत असतो. स्थानिक पातळीवर राबवलेल्या उपाययोजनांमुळे या साथी आणि विषाणूंचे निर्मूलनही होते. मात्र, कोविड, प्लेग यांसारका एखादाच विषाणू अवघ्या जगासाठी, देशासाठी किंवा मोठ्या भूप्रदेशासाठी डोकेदुकी ठरतो. एचएमपीव्ही त्यापैकीच एक असल्याचे मानले जात आहे. या विषाणू किंवा आजाराचा धोका कोणासाठी अधिक आहे? याबाबत तज्ज्ञ खाली बाबी दर्शवतात:
- लहान मुले.
- ज्येष्ठ व्यक्ती
- कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले लोक
अभ्यासक सांगतात की, खास करुन एचएमपीव्ही संसर्ग हे हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला म्हणजेच हिवाळा संपून तापमान वाढत जाते आणि हळूहळू उन्हाळा सुरु होतो तो काळ. या काळात हा आजार बळावू शकतो ज्यांची लक्षणे संपर्कात आल्यानंतर 3 ते 6 दिवसांनी दिसून येतात. (हेही वाचा, HMPV Outbreak In China: चीनमध्ये पसरला नवीन HMPV व्हायरस! भारताने वाढवली खबरदारी; आरोग्य महासंचालनालय म्हणाले, 'काळजी करण्याची गरज नाही')
HMPV चा प्रसार कसा होतो?
प्राप्त महितीनुसार हा विषाणूजन्य आजार फ्लू (ताप) किंवा कोविड-19 प्रमाणेच श्वासोच्छवासाच्या थेंबांद्वारे आणि थेट संपर्काद्वारे पसरतो. सामान्य संक्रमण पद्धतींमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
- खोकला आणि शिंका येणे
- दूषित पृष्ठभागांना स्पर्श करणे
- मिठी मारणे किंवा हस्तांदोलन करणे यासारखा जवळचा शारीरिक संपर्क
- प्रतिबंधात्मक उपायांमध्ये वारंवार हात धुणे, मुखवटे घालणे आणि आजारी व्यक्तींचा जवळचा संपर्क टाळणे यांचा समावेश होतो.
HMPV विरुद्ध COVID-19: यांच्यात समानता आणि मुख्य फरक काय?
साम्य
- दोन्ही विषाणू श्वसन प्रणालीला लक्ष्य करतात, ज्यामुळे सौम्य ते गंभीर आजार होतात.
- श्वसनाचे थेंब आणि दूषित पृष्ठभागांद्वारे दोन्ही आजारांचे संक्रमण होते.
- असुरक्षित गटांमध्ये मुले, वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींचा समावेश होतो.
मुलभूत फरकः
- कोविड-19 प्रतिबंधक लसी आणि विषाणूविरोधी उपचार अस्तित्वात आहेत, तर HMPVबाबत कोणतीही विशिष्ट लस किंवा विषाणूविरोधी उपचारपद्धती नाही.
- HMPV मुळे प्रामुख्याने सर्दीसारखी लक्षणे दिसून येतात, तर कोविड-19 मुळे बहु-प्रणाली गुंतागुंत होऊ शकते.
HMPV हे चिंतेचे कारण आहे का?
आरोग्य तज्ञ यावर जोर देतात की एचएमपीव्ही असुरक्षित गटांमध्ये गंभीर आजारास कारणीभूत ठरू शकतो. परंतु कोविड-19 च्या तुलनेत त्याचा एकूण परिणाम फारसा गंभीर नाही. अज्ञात उत्पत्तीच्या न्यूमोनियासाठी प्रायोगिक देखरेख प्रणाली यासारख्या चीनच्या सक्रिय उपाययोजनांचा उद्देश व्यापक उद्रेक रोखणे हा आहे. (हेही वाचा: 'Disease X': कोरोनानंतर नव्या गूढ महामारीचे संकेत; जाणून घ्या काय आहे 'एक्स' आजार, त्याची लक्षणे व कशी घ्याल काळजी)
भारतात HMPV रुग्ण नाही; राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राची पुष्टी
भारतात, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (NCDC) एचएमपीव्हीच्या कोणत्याही नोंदवलेल्या प्रकरणांची पुष्टी केलेली नाही. डॉ. अतुल गोयल यांच्यासारखे तज्ज्ञ आश्वासन देतात की एचएमपीव्ही मुळे तात्काळ कोणताही धोका नाही आणि सुरक्षित राहण्यासाठी प्रमाणित सावधगिरीची शिफारस करतात.
दरम्यान, सोशल मीडियावर अनेक दावे केले जात असले तरी, वास्तव वेगळे आहे. एचएमपीव्ही हा जेवढा समजला जातो आहे तेवढा धोकादायक नसल्याचे अभ्यासक सांगतात.