Social Media will be Banned for Children in India: ऑस्ट्रेलियापाठोपाठ आता भारतही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील १८ वर्षांखालील मुलांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. सोशल मीडियावर १८ वर्षांखालील मुलांचे अॅक्टिव्हिटी रोखण्यासाठी सरकार लवकरच नवा कायदा आणू शकते. या कायद्यानुसार आता १८ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर खाते उघडण्यासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी केंद्र सरकारने डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट (डीपीडीपी), २०२३ अंतर्गत नियमांचा मसुदा तयार केला आहे. यात म्हटले आहे की, डेटा संकलन करणाऱ्या संस्थेला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की जो व्यक्ती मुलाची आई किंवा वडील असल्याचा दावा करत आहे त्याला कोणताही कायदेशीर आधार आहे की नाही. यासंदर्भात सरकारने लोकांकडून सूचनाही मागवल्या आहेत. हेही वाचा: ISRO Grows Cowpea Seeds in Space: इस्रोचा चमत्कार! अवकाशात उगवल्या चवळीच्या बिया; पहा फोटो
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, लोक mygovernment.in भेट देऊन या मसुद्यावर आपले आक्षेप नोंदवू शकतात आणि यासंदर्भात सूचनादेखील देऊ शकतात. मात्र, या मसुद्याशी संबंधित लोकांच्या हरकती व सूचनांवर १८ फेब्रुवारीपासून विचार केला जाणार आहे.नुकताच ऑस्ट्रेलियन सरकारनेही १६ वर्षांखालील मुलांवर सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचे हे पाऊल १८ वर्षांखालील मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी एका निवेदनात म्हटले आहे की- सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किमान वयोमर्यादा लागू करण्यासाठी सरकार कायदे करेल. त्यानंतर एका निवेदनात म्हटले होते की, ऑस्ट्रेलियन सरकार 16 वर्षांखालील नागरिकांना त्यांच्या सेवा वापरण्यापासून रोखण्यात अपयशी ठरलेल्या सोशल मीडिया कंपन्यांवर कोट्यवधी डॉलर्सचा दंड ठोठावेल.