Photo Credit- X

Pakistan Suicide Blast: पाकिस्तानी सुरक्षा दलांसाठी बलुचिस्तान हा सर्वात आव्हानात्मक प्रदेश राहिला आहे आणि तेथेच आता आत्मघाती हल्ल्याची घटना घडली आहे. प्रवासी व्हॅन आणि पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य करून आत्मघाती बॉम्बस्फोट केल्याची घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. त्यात आठ सुरक्षा कर्मचारी ठार झाले असून 40 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. बहुतेक सुरक्षा अधिकारी होते. बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) या फुटीरतावादी गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

प्रवासी व्हॅन आणि पोलिस सुरक्षा वाहनाला लक्ष्य केलेल्या हल्ल्यात मोठा स्फोट झाला. व्हॅनमध्ये प्रवास करणारे बहुसंख्य प्रवासी हे सुरक्षा अधिकारीही असल्याचे नंतर उघड झाले. आत्मघातकी स्फोटानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या तुकड्या घटास्थळी दाख झाल्या आहेत.

पाकिस्तान आत्मघाती स्फोटाचे व्हिडिओ

बचाव पथकांनी जखमींना आणि मृतांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक होती. बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) गटाच्या मजीद ब्रिगेडने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. "बलुच लिबरेशन आर्मीच्या मजीद ब्रिगेड फिरदाई (आत्मघाती बॉम्बर) युनिटने  पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर फिदाईन हल्ला केला, ज्यात अनेक लष्करी जवानांचा खात्मा झाला. आमची संघटना या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारते," असे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.