ममता बॅनर्जी या तर हिरण्यकश्यपू राक्षसाच्या कुळाच्या वंशज : साक्षी महाराज
Sakshi Maharaj Targets Mamta Banarjee (Photo credits: File Photo)

पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये दर दिवशी जय श्री राम या घोषणेमुळे उद्भवणाऱ्या वादात आता भाजपाचे उन्नाव (Unnao) मतदारसंघातील खासदार साक्षी महाराज (Sakshi Maharaj) यांनी उडी घेत ममता दीदींवर  शाब्दिक हल्ला चढवला आहे. साक्षी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना ममता बॅनर्जी (Mamta Banarjee) यांची तुलना पुराणातील हिरण्यकश्यपू नामक राक्षसाशी केल्याचे समोर येत आहे. हिरण्यकश्यपू राक्षसाचा मुलगा भक्त प्रल्हाद याने जय श्री राम म्हणताच या राक्षसाचा पारा चढायचा आणि आता बंगाल मध्ये ममता यांची देखील समान वागणूक पाहायला मिळत आहे असे साक्षी यांनी म्हंटले होते. या प्रतिक्रियेवरून साक्षी महाराजांना नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरवात केली आहे.

ANI ट्विट 

काही दिवसांपूर्वी भाजपाच्या काही समर्थकांनी ममता यांच्या गाडीसमोर जय श्री राम अशा घोषणा दिल्या होत्या यामुळे संतापून गाडीबाहेर येत ममता यांनी समर्थकांना खडेबोल सुनावले होते, याच घटनेचा संदर्भ देत साक्षी महाराज म्हणतात की रामाचे नाव घेतल्यावर ममता यांचा संताप होतो, त्या अक्षरशः गाडीतून उतरून भांडायला लागतात, लोकांना तुरुंगात टाकतायत रामाचे नाव घेण्यापासून रोखण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणतायत यावरून कदाचित त्या देखील हिरण्यकश्यपूच्याच वंशातील असल्याचे दिसून येतेय. Mamta Banarjee Met Gala Meme Case: भाजपा युवा नेत्या 'प्रियंका शर्मा' ला ममता दीदी यांचा मीम बनवल्याप्रकरणी अखेरीस जमीन मंजूर

 

नेटकऱ्यांचा साक्षी महाराजांवर पलटवार

ममता यांची गणना राक्षसाच्या कुळात करणाऱ्या साक्षी महाराजांना नेटकऱ्यांनी मात्र चांगलेच फैलावर घेतले आहे. हिरण्यकश्यपू हा सतयुगातील राक्षस होता त्यादरम्यान भगवान विष्णू यांचा तिसरा म्हणजेच नरसिंह अवतार भूतलावर असल्याचे पुराणात म्हंटले आहे. तर राम हा विष्णूंचा सातवा अवतार असून तो वेगळ्या युगातील आहे. मग भक्त प्रल्हाद सतयुगात जय श्री राम असा जप का करेल असा सवाल सोशल मीडियावरून केला जात आहे. यावरून साक्षी महाराजांनी विधान कारण्यापूर्वीची पुरणाचा नीट अभ्यास करावा असा सल्ला देखील नेटकरी देत आहेत.

एकीकडे ममता यांचा होणारा संताप बघून भाजपा समर्थकांना मात्र वेगळाच चेव चढलेला दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी आणखीन एका कार्यकर्ताने ममता दीदी यांना जय श्री राम लिहिलेली लाखभर पोस्ट कार्ड पाठवणार असल्याचे सांगितले होते तर बाबुल सुप्रियो यांनी ममता दीदी या अनुभवी नेत्या आहेत त्यांनी त्यांच्या प्रतिष्ठेची आब राखायला हवी सध्या भाजपाच्या कारवाया पाहता त्या तणावात असल्याचे दिसतेय म्हणून त्यांना गेट वेल सून चे कार्ड पाठवणार असल्याचे देखील म्हंटले आहे.