BJYM leader Priyanka Sharma and morphed photo of Mamata Banerjee. (Photo Credit: Facebook)

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या युवा नेत्या प्रियांका शर्मा यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या फोटोचे मीम बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.आज, सुप्रीम कोर्टात या बाबत सुनावणी झाल्यावर प्रियांका यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोर्टाने सुरवातीला प्रियांकानी ममता बॅनर्जींची माफी मागितल्यावरच जामीन देण्यात येईल अशी अट ठेवली होती होती मात्र या निर्णयाच्या काहीच वेळानंतर प्रियांकाचे वकील एन. के कौल यांना बोलावून घेत आदेशात फेरबदल केल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.त्यामुळे माफी न मागता जामीन मिळाल्याने प्रियांका यांचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ANI ट्विट 

प्रियांका शर्मा यांनी ममता बॅनर्जी यांचा फोटो फोटशॉप्ड करून अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या मेट गाला लुक सारखाच ममता दीदींचा फोटो बनवत फेसबुक वर पोस्ट केला होता. या फोटोला काहीच वेळात नेटकऱ्यांनी तुफान व्हायरल केले होते मात्र त्यामुळे संतापलेल्या टीएमसी कार्यकर्त्यांनी प्रियांकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी प्रियांका शर्मांना 10 मे ला अटक केले तसेच 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली होती.

फेसबुकवर अशा प्रकारचा मीम व्हायरल करणाऱ्या प्रियांका यांच्यावर आयपीसी कलमी 500 (मानहानी) कलम 66A (आक्षेपार्ह्य विधान/संदेश) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67A नुसार ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह्य पोस्ट केल्याबद्दल गैर जमानती गुन्हा दाखल करण्यात आला होता.यांनतर प्रियांका यांचे वकील एन. के. कौल यांनी कोर्टाकडे या झाल्याची लवकर सुनावणी करण्यात यावी अशी विनंती केली होती. ममता बॅनर्जी यांचा फोटो हास्यात्मक बनवून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या महिलेला अटक

सुनावणीच्या दरम्यान न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी व संजीव खन्ना यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने, भाजपा नेत्या प्रियंकांनी ममता दीदींची लिखित माफी मागावी असे आदेश दिले होते.मात्र जामीन नाकारला गेल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात संदेश जाऊ शकतो. तसेच माफी मागण्याचे आदेश म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखेच आहे असा युक्तिवाद प्रियांका यांच्या वकिलांनी कोर्टात केला होता त्यानुसार निर्णयाचा पुनर्विचार करून तात्काळ जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.अखेरीस चार दिवसांच्या कोठडीनंतर आज भाजपच्या युवा मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या प्रियंका शर्मा घरी परतल्या आहेत.