ममता बॅनर्जी यांचा फोटो हास्यात्मक बनवून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या महिलेला अटक
Mamata Banerjee (Photo Credits: ANI)

सध्या सोशल मीडियात यंदाच्या मेट गाला 2019 (Met Gala 2019) मध्ये सहभागी झालेली बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिच्या लूकवर सोशल मीडियात खुप खिल्ली उडवली गेली. त्यानंतर आता पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांची प्रियांकाच्या लूकमधील फोटो एडिट करुन खिल्ली उडवली गेली आहे. य प्रकरणी प्रियांका शर्मा नावाच्या महिलेला अटक करण्यात आली असून त्या भाजप पक्षाच्या युवा मोर्चाच्या पदाधिकारी आहेत.

ममता बनर्जी यांचा प्रियांकाच्या मेट गाला मधील लूक सोबत एडिट करुन प्रियांका शर्मा यांनी हास्यात्मक पद्धतीने तयार केला. तसेच हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या काही नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट दिसून येत आहे. मात्र केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रीमो यांनी प्रियांका यांच्या अटकेचा निषेध केला आहे. तसेच त्यांची तत्काळ सुटका करावी अशी मागणी केली आहे. तसेच फोटोसाठी अटक करण्यात येत असल्यात हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.(ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाचा दणका; विश्वासू आणि जवळच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या)

तसेच प्रियांका शर्मा यांना अटक केल्यानंतर काँग्रेस मधील कार्यकर्त्यानेसुद्धा मोदी यांची तुलना हिटलर सोबत केली असल्याची पोस्ट केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यालासुद्धा अटक करण्यात यावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.