West Bengal Assembly Elections 2021: पश्चिम बंगाल मध्ये शिवसेना विधानसभा निवडणूक लढवणार, संजय राऊत यांची माहिती
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

West Bengal Assembly Elections 2021:  पश्चिम बंगाल येथे येत्या मे महिन्यात विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. याच पार्श्वभुमीवर राजकीय पक्षांकडून त्यासाठी जोरदार तयारी करण्यास आतापासूनच सुरुवात झालीआहे. या निवडणूकीत टीएमसी आणि भाजप मध्ये तगडी टक्कर होणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना पक्षाने ही एन्ट्री केली आहे. तर शिवसेना आता पश्चिम बंगाल येथून निवडणूक लढवणार अशी चर्चा होतीच पण आज खासदार संजय राऊत यांनी अखेर निर्णय जाहीर केला आहे. शिवसेना निवडणूकीसाठी 100 उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Assembly Election 2021: नितीन राऊत, मुकुल वासनिक यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी; विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज; सोनिया गांधी यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय)

मीडिया रिपोर्ट्स नुसार, पश्चिम बंगाल मधील निवडणूका लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा येथे दौरा करु शकतात. शिवसेना कोलकाता, हुबळी, दमदमसह काही ठिकाणी आपले उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.(Tamil Nadu Assembly Election 2021: पोंगल सणाचे निमित्त; राहुल गांंधी, मोहन भागवत, जेपी नड्डा यांचा तमिळनाडू दौरा, विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती)

Tweet:

दरम्यान, राजकीय जाणकरांच्या मते, शिवसेना जर पश्चिम बंगाल येथून निवडणूक लढवत असेल तर भाजपला धक्का बसू शकतो. दुसऱ्या बाजूला भाजप पश्चिम बंलाच्या या निवडणूकीसाठी जोरदार तयारी करत आहे. याआधी शिवसेना पक्षाने 2019 मध्ये लोकसभा निवडणूकीत सुद्धा बंगाल मध्ये आपले उमेदवार उतरवले होते. त्यावेळी शिवसेना भाजप प्रणित पक्षाचा भाग होता.