Assembly Election 2021: नितीन राऊत, मुकुल वासनिक यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी; विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज; सोनिया गांधी यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
Congress leader | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नववर्षात देशभरातील विविध राज्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. त्यामळे विधानसभा निवडणूक 2021 डोळ्यामोर ठेऊन काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पक्षातील ज्येष्ठांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. यात महाराष्ट्रातील मुकुल वासनिक (Mukul Wasnik), नितीन राऊत (Nitin Raut) या दोन नेत्यांचाही समावेश आहे. या दोन नेत्यांसोबतच भूपेश बघेल (Bhupesh Baghel), अशोक गहलोत (Ashok Gehlot), बीके हरिप्रसाद (BK Hariprasad) यांच्यासह इतरही नावांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांना पक्षाचे निरिक्षक आणि विधानसभा निवडणूक प्रचार समितीवरील निरीक्षक अशी जबाबदारी सोपवली आहे. हे सर्व नेते यंदा पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पडतील. काँग्रेस संघटना महासचिव केसी वेणुगोपाल यांनी या निवडीबाबतची पत्रे संबंधितांकडे दिली.

नववर्षात असम (Assam), पश्चिम बंगाल (West Bengal) , केरल (Kerala), तमिलनाडु (Tamil Nadu) आणि पुडुचेरी (Puducherry) या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ नेत्यांची निवड केली आहे. या सर्व नेत्यांकडे संबंधित राज्याचे निरीक्षक पद असेल. तसेच, या नेत्यांना विधानसाभ निवडणुकीत प्रचार मोहिमेबाबतही महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागेल. (हेही वाचा, Maharashtra Congress State President: महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार स्पर्धा, अशोक चव्हाण, राजीव सातव, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांची नावे चर्चेत)

काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, भूपेश बघेल (Bhupesh Baghel) ,मुकुल वासनिक (Mukul Wasnik) आणि शकील अहमद खान या ज्येष्ठांकडे असम विधानसभा निवडणूक, अशोक गहलोत (Ashok Gehlot), लुईजिनो फ्लेरियो आणि जी परमेश्वर यांच्याकडे केरळ विधानसभा निवडणूक तर, विरप्पा मोईली, एम एम पल्लाम राजू आणि नितीन राऊत यांच्याकडे तामिळनाडू आणि पुड्डुचेरी विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

काँग्रेस संघटना महासचिव केसी वेणुगोपाल यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार वरिष्ठ निरिक्षक संबंधीत राज्यांच्या प्रभारींशी समन्वयाचे काम करतील.