Rain And Heat Wave | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Weather Forecast Tomorrow: राज्यातील सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 24 तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार आहे.   मुंबईत 4-5 जून पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे पावसाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस तूफान पावसाची शक्यता असल्याचा अंदाज  हवामान खात्याने व्यक्त केला आहे. केरळमध्ये मान्सीन वेळेअगोदरच दाखल झाला. त्यामुळे राज्यातही  मान्सूनअगोदरच दाखल होण्याची शक्यता आहे.

उद्याचे हवामान कसे असणार?

यंदा राज्यात सगळ्यांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पाऊस लवकर झाल्यास नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. उद्याच्या हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असुन रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पवासचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान कोल्हापूर,  सातारा, अहमदनगर, बीड आणि जालना भागात  वादळी वाऱ्यासह हलक्या  पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या एक दोन दिवसात  राज्यात मध्य महाराष्ट्र अहमदनगर नाशिक संभाजी नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड परभणी जालना येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे.