Weather Forecast Tomorrow: हवामान खात्याने मान्सून हा केरळमध्ये पोहोचल्याची औपचारिक घोषणा केली आहे. साधारणपणे मान्सूनहा दरवर्षी 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो. पुढील २४ तासांत तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. येत्या 3-4 दिवसांत तामिळनाडू आणि कर्नाटकचा काही भाग तसेच उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि उर्वरित ईशान्य राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. उद्याचे हवामान कसे असणार याबाबत हवामान खात्याने सांगितले असुन, उद्या, राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेत अजुन वाढ होण्याची शक्यता जाणवते असुन मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात ढगाळयुक्त दमटयुक्त उष्णतेचे वातावरण कायम असणार आहे.
सध्या भारतात अनेक ठिकाणी पारा 50 च्या पुढे गेला आहे. मान्सून लवकर दाखल झाल्यामुळे आणि पाऊस पडल्यास नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार हे नक्की आहे. सध्या सूर्य आग ओकत असुन उष्माघातामुळे अनेक नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. केरळ मध्ये मान्सून दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रातील खान्देश, विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात, शनिवार दिनांक 1 जून ते सोमवार 3 जूनर्यंत वळीव पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.