सध्या आधार कार्ड (Aadhar Card) हे सर्व शासकीय कामांसाठी महत्वाचे ठरले आहे. तसेच आधार कार्ड हे व्यक्तीची ओळख करुन देते. मात्र आता निवडणूक आयोगाने (Election Comission) मोदी सरकारला पत्र लिहित मतदान कार्ड (Voting Card) आधार कार्डला जोडावे अशी मागणी केली आहे. यामुळे खोट्या मतदान कार्डांवर आळा बसणार असल्याची शक्यता आयोगाने व्यक्त केली आहे. यापूर्वी मतदान कार्ड पॅन कार्डला लिंक करावे असे सांगण्यात आले होते.
आतापर्यंत 32 कोटी आधार कार्ड मतदान कार्डसोबत लिंक करण्यात आले आहेत. तरीही 'एक व्यक्ती एक मत' हे योग्य पद्धतीने राबवायचे असल्यास मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करणे अत्यावश्यक असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. तर निवडणूक आयोगाने आधार आणि मतदान कार्ड लिंक असणे वैकल्पिक असल्याचे म्हटले होते.(खबरदार! आधार कार्ड सक्ती करताय? 1 कोटी रुपये दंड सोबत 1 वर्ष तुरुंगवास भोगण्यास तयार राहा)
यापूर्वीसुद्धा निवडणूक आयोगाने मोदी सरकारकडे मदान कार्ड आधार कार्डला लिंक करावे अशी मागणी केली होती. त्यावेळी आधार कार्ड संबंधित प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरुच होते. त्यामुळे आता पुन्हा निवडणूक आयोगाने ही मागणी मोदी सरकारला पत्राद्वारे केली आहे. मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर आता या मुद्द्यावर सुद्धा काहीतरी निर्यण घेण्यात येईल अशी अपेक्षा आयोगाने केली आहे.