
विस्ताराच्या (Vistara Airlines) माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कारण एअरलाइन्स आता 31 मार्च पर्यंत फ्लाइट रिशेड्युलसाठी कोणताही शुल्क स्विकारणार नाही आहे. विस्ताराचे असे म्हणणे आहे की, कोविड19 च्या कारणास्तव खुप समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. सरकारच्या निर्बंधामुळे त्यांना आपल्या प्रवासामध्ये बदल ही काहीवेळेस करावा लागत आहे. याच कारणास्तव एअरलाइन्सकडून चेंज फी न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ही सुविधा अशा प्रवाशांसाठी असणार आहे जे डायरेक्ट बुकिंग करतील. म्हणजेच मेकमायट्रिप, यात्रा किंवा क्लिअरट्रिप सारख्या एजेंट वेबसाइटच्या माध्यमातून फ्लाइट बुकिंग करणाऱ्यांना याचा फायदा घेता येणार नाही आहे. ही सुविधा फक्त एकदाच मिळणार आहे. विस्तारा टाटा सन्स आणि सिंगापुर एअरलाइन्सचे जॉइंट वेंचर आहे.(SpiceJet: मुंबई उच्च न्यायालयाचे स्पाईसजेटला 8 फेब्रुवारीपर्यंत नवीन कंत्राटी कर्मचारी नियुक्त न करण्याचे निर्देश)
विस्ताराने असे म्हटले की, गेल्या काही महिन्यात कोविड19 च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने काही निर्बंध लावले. यामुळे विमानसेवेवर त्याचा परिणाम झाला. परंतु आता पुन्हा विमानसेवेची मागणी वाढत आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत यामध्ये थोडी वाढ झाली आहे. दरम्यान, विस्ताराने गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या फेब्रुवारीची बहुतांश उड्डाणे रिशेड्युल केली आहेत.
लाइव्ह मिंटच्या एका रिपोर्टनुसार, विस्ताराच्या फ्लाइट रिशेड्युल करण्यासाठी प्रवाशांना काही समस्यांचा सामना करावा लागत आहेत. बहुतांश प्रवाशांनी सोशल मीडियात याबद्दल लिहिले सुद्धा आहे. यामुळेच विस्ताराच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, रिशेड्युल आणि रिफंड सारखी प्रकरणे सोडवण्यसाठी नागरिकांची मदत केली जात आहे.