उत्तराखंड राज्यातील पूरग्रस्त (Uttarakhand Flood) नागरिकांसाठी मदत आणि बचावकार्य साहित्या घेऊन जाणाऱ्या एका हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघातात दोघे जण ठार झाले आहेत. हे हेलिकॉब्टर देहरादून (Dehradun) येथून पूरग्रस्तांसाठी राशन घेऊन मोलडी ते अराकोट असे निघाले होते. दरम्यान, उत्तरकाशी (Uttarkashi) येथे या हेलिकॉप्टरला अपघात झाला. यात पायलट, को-पायलट आणि एसडीआरएफ जवानासह तीन लोक प्रवास करत होते. ही घटना बुधवारी घडली.
प्राप्त माहितीनुसार, मदत आणि बचावकार्यात व्यग्र असताना या हेलिकॉप्टरचा वीजेच्या तारांना स्पर्श झाला. त्यामुळे हा अपघात घडला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर हे हैरिटेज एव्हिएशनचे होते. हे हेलिकॉप्टर बचाव आणि मतदकार्यासाठी वापरण्यात येत होते. या अपघातानंतर एसडीएम देवेंद्र नेगी यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरमथून एकूण तीन लोक प्रवास करत होते. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक गंभीर जखमी आहे. जखमीला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा, नेपाळ येथे हेलिकॉप्टर कोसळून, पर्यटन मंत्र्यांसह सहा जण ठार)
एएनआय ट्विट
Uttarakhand: A helicopter, carrying relief material to flood affected areas, has crashed in Uttarkashi. More details awaited. pic.twitter.com/OOH8Vz8Nef
— ANI (@ANI) August 21, 2019
एएनआय ट्विट
#UPDATE Sub-Divisional Magistrate (SDM) Devendra Negi on Uttarakhand helicopter crash: Two out of the three persons who were on-board the helicopter, have died & one is severely injured. https://t.co/iN036mD0Fh
— ANI (@ANI) August 21, 2019
उत्तराखंड राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी महापूर आला आहे. या महापूराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान कार्यरत आहेत. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरसुद्धा या मदतकार्याचाच एक भाग होते.