उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथील एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आर्थिक मंदीमुळे त्रस्त असलेल्या माजी वायुसेनेतील एका कर्मचाऱ्याने फाशी लावून आयुष्य संपवले आहे. तर मृत कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्यामागील देशातील आर्थिक मंदी आणि भ्रष्टाचार हे कारण दिले आहे. त्याचसोबत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांना या परिस्थितेचे दोषी ठरवले आहे. तसेच मृत कर्मचाऱ्याने चार पानांची सुसाईट नोट सुद्धा लिहिली आहे. पोलिसांनी मृत कर्मचाऱ्याच्या घरातील मंडळींना याबाबत सूचना दिली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
मृत कर्मचाऱ्याचे नाव बिजन दास असल्याचे सांगण्यात आले असून 55 वर्षीय आहे. सुसाइट नोटमध्ये बिजन याने देशातील आर्थिक मंदीसाठी चिदंबरम यांनी केलेला भ्रष्टाचार कारणीभुत असल्याचे म्हटले आहे. तसेच गायक मुलाच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. त्याचसोबत जिल्हा प्रशासनाला सुसाईट नोट मधून मृतदेह प्रयागराज येथे दफन करावा असे ही सांगितले आहे. मात्र पोलीस या प्रकरणाचा अधिक छडा लावत आहेत.(दिल्ली: नशेच्या अवस्थेत गाडी चालवणाऱ्या तरुणाला ट्रॅफिक पोलिसांनी आकारला भला मोठा दंड; तरुणाने चिडून बाईकच पेटवली Watch Video)
बिजन दास 6 सप्टेंबर रोजी काही कामासाठी प्रयागराज येथे आले होते. त्यानंतर प्रयागराज येथीलच एका हॉटेलमध्ये त्यांनी रुम भाड्याने घेत तेथे थांबवले होते. रात्री त्यांना खोलीत जाताना पाहिले होते. मात्र सकाळी ते खोलीतून बाहेर आलेच नाही. त्यामुळे हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने बिजन दास झोपले असलतील असे मानत त्यांना उठवले नाही. परंतु संध्याकाळी हॉटेल मॅनेजरला याबाबत सांगितल्यानंतर त्यांना कूलरच्या मागील बाजूस पाहिले. त्यावेळी बिजन दास यांनी पंख्याला लटकून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.