Donald Trump India Visit Day 2 Live Updates: डोनाल्ड ट्रम्प आणि First Lady मेलेनिया ट्रम्प दोन दिवसीय भारत दौरा संपवून अमेरिकेसाठी रवाना
बातम्या
Dipali Nevarekar
|
Feb 25, 2020 10:27 PM IST
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प (US President Donald Trump) यांच्या भारत दौर्याचा आज (25 फेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. काल 11.40च्या आसपास भारतामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी अहमदाबादमध्ये महात्मा गांधीजींच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. त्यानंतर मोटेरा स्टेडियमवरून भारतीयांना संबोधित केल्यानंतर आग्रा येथे ताजमहालाला त्यांनी भेट दिली. आज दिल्लीमध्ये डोनाल्ड ट्र्म्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यामध्ये बैठक होणार आहे. आजच्या बैठकीमध्ये भारत-अमेरिका यांच्यामधील व्यापार संबंधी करारावर चर्चा होणार आहे. त्यासोबतच युएस एम्बेसी आणि तेथील कर्मचार्यांसोबत चर्चा, रात्री अमेरिकेला निघण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. काल मोटेरा स्टेडियमवर केलेल्या घोषणेप्रमाणे आज भारतासोबत अमेरिकेचा 3 बिलियन अमेरिकन डॉलर्सचं डिफेन्स डिल होण्याची शक्यता आहे.
भारत-अमेरिका व्यापार दौर्यासोबतच आज सकाळी डोनाल्ड ट्र्म्प आणि त्यांची पत्नी मेलानिया महात्मा गांधीजींच्या स्मृतिस्थळाला भेट देणार आहे. यावेळेस ट्र्म्प कुटुंबियांसोबतच अमेरिकन राजदूतावासातील कर्मचारी त्यांच्यासोबत असतील. Namaste Trump कार्यक्रमामधून डोनाल्ड ट्र्म्प यांनी केलं नरेंद्र मोदी यांचे कौतुक; दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याचा पुनरूच्चार.
बौद्धिक संपदा हक्क, व्यापारसुलभता आणि देशाची अंतर्गत सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याविषयी पाच करारही मंगळवारी होतील, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी जाहीर केले होते.