Donald Trump (Photo Credits-ANI)

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांच्या भारत दौऱ्याबाबत माहिती मिळाल्यापासून भारत आणि अमेरिकेमध्ये (India And US) नेमके कोणते करार होणार याविषयी सर्वत्र उत्सुकता होती. आज, 24 फेब्रुवारी अखेरीस ट्रम्प यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली असून, भारत आणि अमेरिकेत तब्बल 3  बिलियन डॉलरचा सैन्य करार (Defence Deal) होणार असल्याचे सांगितले आहे. उद्या 25 फेब्रुवारी रोजी या करारावर दोन्ही देशांकडून स्वाक्षरी करण्यात येईल. यामध्ये 24 Sikorsky MH-60 Romeo Seahawk हेलिकॉप्टर्स आणि 6 Boeing AH-64 Apache यांचा समावेश आहे. दोन्ही देशांमधील सैन्याचे बळ वाढवण्यासाठी आणि अंतर्गत संबंध सुधारण्यासाठी टायगर ट्रिम्फ सारख्या कार्यक्रमांना ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले आहेत. आजच्या दिवसाचे अपडेटस जाणुन घ्या एका क्लिक वर

डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्यानुसार, उद्या दोन्ही देशाच्या प्रतिनिधींकडून भारतीय सैन्य दलाला अत्याधुनिक लष्करी हेलिकॉप्टर आणि इतर उपकरणे परिपूर्णपणे तीन अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्य विकण्याच्या करारावर स्वाक्षरी करतील. दोन्ही देशांमधील सैन्यात अंतर्गत सहकार्य वाढवत असताना, अमेरिका भारताला या ग्रहावरील काही उत्तम आणि ज्यामुळे सर्व घाबरतात अशी लष्करी उपकरणे उपलब्ध करुन देण्यास उत्सुक आहोत. आम्ही आतापर्यंत महान शस्त्रे बनवली आहेत आणि आम्ही आता भारताशी व्यवहार करत आहोत" असेही ट्रम्प यांनी भाषणात म्हंटले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, सूत्रांच्या आधारे समोर येणाऱ्या माहितीन्वये नौदलासाठी सुद्धा तब्बल 2.6 बिलियन डॉलरचा करार निश्चित करण्यात आला आहे. तसेच 6 AH64E Apache हेलिकॉप्टर्सच्या विक्रीसाठी 795 दशलक्ष किमतीचा करार देखील मंजूर झाला आहे.