भीम आर्मी चीफ, चंद्रशेखर आझाद यांनी दिल्लीचे उपराज्यपाल यांना एक पत्र लिहीत, 'मी पूर्वोत्तर दिल्लीतील बर्‍याच भागातील मुस्लिम आणि अनुसूचित जाती जमातीतील लोकांच्या सुरक्षिततेसाठी व संरक्षणासाठी अत्यंत चिंताग्रस्त असल्याचे सांगत हिंसाचाराने बाधित झालेल्या भागाला भेट देण्याची इच्छा वर्तवली आहे.

बीड- परळीत रेल्वे रुळाच्या बाजूला नवजात बालिकेचे जिवंत अर्भक आढळले आहे. आठ दिवसांपूर्वी या अर्भकाचा जन्म झाला असण्याची शक्यता आहे.  

दिल्लीतील उत्तर-पूर्व जिल्ह्यात सीएए  विरुद्ध सुरु असणाऱ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उद्या सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद राहणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी माहिती दिली आहे तसेच  जिल्ह्यातील बोर्ड परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

दिल्लीमध्ये सीएए विरुद्ध पेटलेल्या आंदोलनात एकूण तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, याशिवाय गोकुलपुरी येथे झालेल्या गोळीबारात रतन लाल या पोलीस हेड कॉन्स्टेबलचा देखील मृत्यू झाला आहे.

राज्यातील 19 जिल्ह्यांमधील सुमारे 1,570 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29 मार्च रोजी मतदान होणार आहे. तर 30 मार्चला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, राज्यपालांनी सदस्यांमधून सरपंच निवडीचा अध्यादेश फेटाळल्यानं आता थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. 

 भाजप पक्ष उद्या राज्यभरात एकाचवेळी 400 ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे. राज्यातील सरकारला सक्षम विरोधी पक्ष दाखविण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. उद्या राज्यभरात हे धरणे आंदोलन होणार असून मुंबईतील आझाद मैदानात दुपारी 12 ते 3 यावेळेत भाजपाकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.  

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी पालमच्या एअरफोर्स स्टेशनवर दाखल झाले आहेत. तसेच उद्या ते भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोग राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साक्षीसाठी बोलावणार आहे. शरद पवारांची साक्ष या प्रकरणातील महत्वपूर्ण साक्ष ठरतील असे सांगण्यात येत आहे. 

मीरा भाईंदर मधील भाजपचे नेते नरेंद्र मेहता यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत गीता जैन यांनी त्यांना पराभूत केले होते. त्यांच्या राजीनाम्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

उत्तर पूर्व दिल्लीतील तणावपूर्ण परिस्थिती ही आटोक्यात आली असल्याचे  केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सांगितले आहे. तेथील संवेदनशील ठिकाणी पुरेसा फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Load More

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहेत. तत्पूर्वी गुजरात मधील अहमदाबाद आणि आगरा ते ताजमहाल येथे पर्यंत जबरदस्त रस्तांवरील भिंतीवर सजावट करण्यात आली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प हे परिवारासह भारत दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी कडेकोड बंदोबस्त सुद्धा करण्यात आला आहे. तर सकाळी 11 वाजेपर्यंत डोनाल्ड ट्रम्प हे भारतात पोहचणार आहेत. विमानतळावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि लष्करातील तीन ही दलांचे प्रमुख यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे.

लवकरत मुंबईत महापालिकेची निवडणूक होणार आहे. तर शिवसेनेने राज्यास सत्ता स्थापन केल्यानंतर आता महापालिकेच्या निवडणूकीसाठी त्यांची कसोटी लागणार आहे. याच पार्श्वभुमीवर शिवसेनेकडून महापालिकेच्या पदावर कायम राहण्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर आता आज कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार आहे. एप्रिल अखेर पर्यंत कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तर गिरणी कामगारांसाठी सुद्धा 3 हजार 835 घरांसाठी 1 मार्च रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे.