Melania Trump | Photo Credits: Twitter

भारत दौर्‍यावर आलेल्या ट्र्म्प कुटुंबियांचा आज दुसरा दिवस आहे. सकाळी राष्ट्रपती भवनाला भेट, राजघाटावर महात्मा गांधीजींच्या स्मृतीला वंदन केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी आणि US First Lady मेलानिया ट्र्म्प दिल्लीमध्ये नानकपुरा परिसरातील सर्वोदय को एड सिनियर सेकंडरी स्कुलला भेट दिली. तेथे मेलानिया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून हॅप्पिनेस क्लासला देखील भेट दिली. यावेळेस मेलानिया यांच्या स्वागतासाठी खास पारंपारिक नृत्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी एका पंजाबी गाण्यावर थिरकणार्‍या चिमुकल्याचा भांगडा पाहण्यासाठी चक्क मेलानिया देखील मागे फिरल्या. Donald Trump India Visit: 'भारतात येणे ही सन्मानाची गोष्ट', अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हैदराबाद हाऊसमध्ये प्रतिक्रिया

प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका चिमुकल्याला पंजाबी गाण्याचा ठेका ऐकून बसवत नव्हते. तो देखील प्रेक्षकांमध्ये नाचायला लागला. स्टेजवरील डान्सरच्या नृत्यासोबतच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या थिरकत असलेल्या चिमुरड्यालाही उत्तम दाद मिळत होती. मेलानिया यंनी देखील त्याच्या नृत्याला वाहवा दिली. दिल्ली: डोनाल्ड ट्र्म्प आणि मेलानिया ट्र्म्प यांच्याकडून 'भारत-अमेरिका' मैत्रीचं प्रतिक म्हणून राजघाटावर वृक्षारोपण; महात्मा गांधीजींच्या स्मृतीला अभिवादन.

चिमुकल्याचा भांगडा

दरम्यान सर्वोदय को एड सिनियर सेकंडरी स्कुलला भेट दिल्यानंतर मेलानिया यांनी विद्यार्थी आणि शाळा प्रशासनाचे आभार मानले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पहिला भारत दौरा सुखावह असल्याचं सांगत भारतीय वेलमिंग आणि दयाळू असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.