दिल्ली: डोनाल्ड ट्र्म्प आणि मेलानिया ट्र्म्प यांच्याकडून 'भारत-अमेरिका' मैत्रीचं प्रतिक म्हणून राजघाटावर वृक्षारोपण; महात्मा गांधीजींच्या स्मृतीला अभिवादन
राजघाटावर डोनाल्ड ट्र्म्प । Photo Credits: Twitter/ ANI

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्या भारत दौर्‍याचा आज (25 फेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. आज सकाळी त्यांनी प्रथम भाराताच्या राष्ट्रपती भवनाला भेट देऊन भारत आणि अमेरिकन शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यावेळेस 21 तोफांच्या सलामीसोबत भारतीय सैन्य दलाकडून डोनाल्ड ट्र्म्प आणि मेलानिया ट्र्म्प यांचं जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ट्र्म्प दांपत्य महात्मा गांधीजींच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी राजघाटावर पोहचले. तेथे पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळेस भारत- अमेरिका मैत्रीचं प्रतिक म्हणून त्यांना वृक्षारोपणदेखील केले आहे. भारत आणि अमेरिका अशा दोन्ही देशांसाठी डोनाल्ड ट्र्म्प यांचा भारत दौरा महत्त्वपूर्ण आहे. दरम्यान या कार्यक्रमानंतर डोनाल्ड ट्र्म्प आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर ट्र्म्प कुटुंबीयांचं स्वागत केल्यानंतर त्यांनी साबरमती आश्रमामध्ये महात्मा गांधीजींच्या स्मृतींना वंदन केले. आज राजघाटावर त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी पुष्पचक्र देखील अर्पण केले आहे. इथे पहा डोनाल्ड ट्र्म्प यांच्या भारत दौर्‍यातील दुसर्‍या दिवसाचे अपडेट्स!

ट्र्म्प दांपत्याकडून राजघाटावर वृक्षारोपण 

राजघाटाच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्र्म्प यांनी लिहलेला अभिप्राय 

दरम्यान डोनाल्ड ट्र्म्प यांच्या भारत दौर्‍यातील दुसर्‍या दिवसाची सुरूवात देखील शानदार झाली. डोनाल्ड ट्र्म्प आणि मेलानिया ट्र्म्प यांचं स्वागत 21 तोफांच्या सलामीने करण्यात आलं. त्यानंतर त्यांना भारताच्या तिन्ही दलांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

अमेरिका भारताला अत्याधुनिक लष्करी हेलिकॉप्टर सोबतच अन्य लष्करी साहित्यांची विक्री करणार आहे. हे डिफेन्स डिल सुमारे 3 बिलियन डॉलर्सचे आहे. या करारांविषयीची माहिती ट्रम्प यांनी काल 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमातील भाषणात दिली आहे. आज त्यावर दोन्ही देशांकडून स्वाक्षरि होण्याची शक्यता आहे.