शहरी सहकारी बँकांमध्ये 5 वर्षांमध्ये तब्बल 220 कोटी रुपयांचा घोटाळा: आरबीआय
RBI (Photo Credits: PTI)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने दिलेल्या एका माहितीमध्ये धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. शहरी सहकारी बँकांमध्ये (Urban Cooperative Banks) तब्बल 220 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. वेगवेगळ्या शहरी सहकारी बँकांती वेगवळ्या प्रकरणांमध्ये घडलेल्या घोटाळ्यांचा मिळून आकडा हा 220 कोटी इतका आहे. फसवणूक, अफरातफर, विश्वासघात असे या घोटाळ्यांचे स्वरुप आहे. गेल्या पाच वर्षांतील ही आघडेवारि असून, या कालावधीत अशा प्रकारची सुमारे 1,000 प्रकरणे पुढे आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागवलेल्या माहितीमध्ये हा तपशील पुढे आला आहे.

माहिती अधिकार कायद्यानुसार मागवलेल्या माहितीला उत्तरादाखल दिलेल्या माहितीमध्ये आरबीआयने म्हटले आहे की, सन 2018-19 या काळात सुमारे 181 प्रकरणांमध्ये एकूण सुमारे 127.7 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे पुढे आले. अशा प्रकारांमध्ये बँकांनी 2017-18 मध्ये फसवणूकीच्या 99 प्रकरणांमध्ये सुमरे 16.09 कोटी आणि 2016-17 मध्ये एकूण 27 प्रकरणांमध्ये सुमारे 9.3 कोटी इतक्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचे म्हटले आहे.

आरबीआयने म्हटले आहे की, सन 2015-16 मध्ये 17.3 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची 187 प्रकरणं पुढे आली आहेत. ज्यात 2014-15 दरम्यान 19.8 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची 478 प्रकरणं पुढे आली आहेत. घोटाळे झाल्याचे जे आकडे आहेत ते त्या त्या वर्षांमध्ये झालेल्या एकूण प्रकरणांचे मिळून आहेत. (हेही वाचा, Union Budget 2020: केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय?)

आरबीआयने पुढे म्हटले आहे की, 2014-15 आणि 2018-19 या कालावधीदरम्यान शहरी सहकारपी बँकांमध्ये 221 कोटी रुपयांचे फसवणुकीची सुमारे 972 प्रकरणं उघडकीस आली. आरबीआयने पुढे असेही म्हटले आहे की, फसवणूक प्रकरणांची माहिती बँकांनी स्वत:जवळच न ठेवता आरबीआयला देणे आवश्यक असते. त्यामुळे बँकांनी हे घोटाळे होण्यास जबाबदार ठरलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करावी आणि दोषींवर दंडात्मक कारवाई करावी.

आरबीआयने या प्रकरणांवर कारवाईचे स्पष्टीकरण देण्यास नकार देत म्हटले आहे की, हे आकडे सहज उपलब्ध होऊ शकत नाहीत. यात देशभरातील सुमारे 1544 शहरांतील सहकारी बँकांमध्ये 31 मार्च 2019 पर्यंत सुमारे 4.48 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले होते. यातील सर्वात जास्त म्हणजे 3 कोटी रुपये महाराष्ट्रातील 496 बँकांमध्ये जमा आहेत. तर गुजरातमध्ये 55102 कोटी रुपये 2019 शहरी सहकारी बँकांमध्ये आणि कर्नाटकमध्ये 263 सहकारी बँकांमध्ये 41,096 कोटी रुपये जमा आहेत.