मीरत ( Meerut) मध्ये एका तरूणाने त्याच्या वडिलांनी पबजी (PUBG) खेळू नकोस असे सांगितल्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या मुलाचे नाव आमीर असे आहे. चायनीज गेम पबजी खेळण्यावरून वडिल-मुलामध्ये वाद झाला. रागाच्या भरात मुलाने वडिलांवर गंभीर वार केले. यामध्ये त्यांच्या मानेला छाटण्याचा प्रयत्न झाला. यानंतर त्याने स्वतःलादेखील चाकूने वार करून जखमी केले आहे. सध्या बाप- लेक दोघेही हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.
सतत मोबाईल गेममध्ये राहणार्या मुलाला त्यापासून दूर रहा असा सल्ला वडील इरफान यांनी आमिरला दिला होता. मात्र आमिरने त्यांच्यावर हल्ला केला आहे. दरम्यान या घटनेची तातडीने पोलिसांत तक्रार नोंद झालेली नाही. Fearless And United-Guards: PUBG बॅन झाल्यानंतर Akshay Kumar घेऊन येत आहे स्वदेशी अॅक्शन गेम FAU:G, जाणून घ्या खासियत.
आमिरने रागाच्या भरात वडिलांवर चाकूने अनेक वार केले आहेत. यामध्ये मानेवर वार केल्याचं पहायला मिळालं आहे. आमिरने हे वार त्याला मोबाईल गेम खेळू नकोस असे वडिलांनी सांगितल्यानंतर केले असल्याची माहिती सर्कल ऑफिसर देवेश सिंग यांनी दिली आहे. आमिरच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार तो नशेच्या गर्तेमध्ये होता, त्याच्यावर उपचार सुरू होते. सध्या मीरत मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असलेल्या बाप-लेकांची प्रकृती गंभीर आहे.
मागील काही वर्षामध्ये पबजी गेमने तरूणाईला वेड लावलं आहे. अनेकांनी या गेमच्या नादापायी आत्महत्या देखील केली आहे.