'देशातील कोरोनाचे संकट संपत नाही तोपर्यंत अन्नसेवन करणार नाही'; भाजपच्या मंत्र्याची प्रतिज्ञा
महेश गुप्ता, नगरविकास राज्यमंत्री, उत्तर प्रदेश (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस संकट (Coronavirus Pandemic) देशात मागील दीड वर्षापासून कायम आहे. कोविड-19 ची दुसरी लाट (Covid19 Second Wave) मंदावत असली तर तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. लसीकरण सुरु असले तरी ते पूर्ण होण्यास काही अवधी लागणार आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका नेमका कधी संपणार, हे सांगता येणे अवघड आहे. यातच भाजपच्या एका मंत्र्याने अजब प्रतिज्ञा केली आहे. देशात जोपर्यंत कोरोनाचे संकट संपत नाही तोपर्यंत अन्नसेवन करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील नगरविकास राज्यमंत्री महेश गुप्ता (Mahesh Gupta) यांनी अशी शपथ घेतली असून मागील 5 वर्षांपासून भोजन घेत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

"कोरोना नावाचा हा शत्रू माझ्या प्रिय भारतमधून, संपूर्ण जगापासून नष्ट होईपर्यंत मी अन्न घेणार नाही," असे ते म्हणाले. तसंच माझ्या तपश्चर्येमुळेच उत्तर प्रदेशला करोनाची दुसरी लाट हाताळता आली, असा दावाही त्यांनी केला आहे. कोविड-19 ची तिसरी लाट भारत आणि उत्तर प्रदेशात येऊ नये म्हणून मी शपथ घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य पूर्णपणे तयार असून मुलांसाठी स्वतंत्र्य वॉर्ड तयार केले आहेत. सर्व आवश्यक यंत्रणा सज्ज आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुकही केले. त्यांनी इतर देशांच्या तुलनेत कोरोना संकटामुळे चांगले नियंत्रण मिळवले असल्याचे ते म्हणाले. (हे ही वाचा: A Suitable Boy Controversy: ‘ए सूटेबल बॉय’ वेब सीरिजवरुन वाद, रीवा येथे Netflix च्या 2 अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल, भाजप मंत्री म्हणले 'मंदिरात किस मान्य नाही')

पुढे ते म्हणाले की, "देशात दहशतवाद संपण्यासाठी अन्नसेवन न करण्याचे वचन मी दिले होते. त्याचाच परिणाम म्हणून देशात दहशतवाद अखरेचा श्वास घेत आहे. त्याची कंबर मोडली आहे."