नेटफ्लीक्सच्या (Netflix) दोन अधिकाऱ्यांविरुद्ध मध्य प्रदेशमधील रीवा येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. नेटफ्लिक्सवर सुरु असलेल्या ‘ए सूटेबल बॉय’ (A Suitable Boy) या सीरिजवरुन निर्माण झालेल्या वादानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये एका मंदिरात चुंबन घेतल्याचे दृष्ट दाखवण्यात आले आहे. मध्यप्रदेशमधील भाजपचे एक मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तर म्हटले आहे की, मंदिरात किस करणे हे आम्हाला मान्य नाही. तो एक वेगळा काळ होता. आताचा काळ वेगळा आहे. असे म्हणत मिश्रा यांनी नेटफ्लिक्सच्या मालिकेवर टीका केली आहे.
मिश्रा यांनी म्हटले आहे की, वेब सीरिज ए सूटेबल बॉयमध्ये सुटेबल असे काहीच नाही. उलट सीरिजमध्ये मंदिरात आक्षेपार्ग दृष्ट चित्रित करण्यात आले आहे. मंदिरात अशा प्रकारची दृश्ये का चित्रित केली जावीत? असा सवाल उपस्थित करत हे चुकीचे असल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे. तसेच, गृह आणि विधी विभागाची याबाबत बैठक बोलावण्यात आल्याचेही मिश्रा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गृह आणि विधी विभागाच्या बैठकीत वेब सीरिज 'ए सुटेबल बॉय'चे निर्माता दिग्दर्शक आणि संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. (हेही वाचा, Netflix, Amazon Prime Video, Hotstar या OTT प्लॅटफॉर्मसह ऑनलाईन न्यूज पोर्टल वर आता केंद्रीय प्रसारण खात्याची असणार करडी नजर)
वेब सीरीज 'ए सूटेबल ब्वाॅय' में कुछ भी सूटेबल नहीं हैं। फिल्म में मंदिर के अंदर ऐसे आपत्तिजनक दृश्य क्यों फिल्माए जाने चाहिए जिससे किसी की भावनाएं आहत हों। ये गलत है। इस संबंध में आज गृह और विधि विभाग के अफसरों की बैठक बुलाई है। @BJP4India @BJP4MP @PrakashJavdekar @mohdept pic.twitter.com/bNGi9Cw2hC
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) November 23, 2020
मध्यप्रदेशमधील मंत्री नरोत्तम मिश्र यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सीरिजमध्ये आक्षेपार्ह दृश्यांसाठी OTT Platform Netflix व्यवस्थापनाशी संबंधित मोनिका शेरगिल आणि अबिका खुराना यांच्याविरुद्ध रीवा येथे भा.द. सं. कलम 295 अ (धार्मिक भावनांना जाणीवपूर्वक धक्का पोहोचवणे) अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौरव तिवारी नामक व्यक्तीने ही तक्रार दिली आहे.