UP Shocker: कलयुगी आईने सॅनिटायझर टाकून पोटच्या मुलीला जिवंत जाळले; जाणून घ्या काय होता चिमुरडीचा गुन्हा
Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये (Aligarh) हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका आईने आपल्या 6 वर्षाच्या निष्पाप मुलीला जिवंत जाळले आहे. मुलगी आपले ऐकत नसल्याच्या रागातून आईने हे कृत्य केले आहे. या कलयुगी आईने मुलीवर सॅनिटायझर ओतून तिला पेटवून दिले. यामुळे मुलगी गंभीररीत्या भाजली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध खुनाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशच्या अतरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहम्मदपूर बधैरा गावात घडली. इथे मुलीच्या एका छोट्याश्या कृत्यामुळे संतापलेल्या आईने तिच्यावर सॅनिटायझर ओतून तिला पेटवून दिले. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान या निष्पाप मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी तिच्यावर अंत्यसंस्कारही केले आणि कोणालाही याची माहिती दिली नाही, मात्र कुटुंबातील एका नातेवाईकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

त्यानंतर मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्यानंतर या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. मोहम्मदपुरा बुढेरा येथे राहणाऱ्या नोटी सिंग यांना तीन मुले आहेत. रविवारी त्यांची 6 वर्षांची धाकटी मुलगी वंदना घराबाहेर खेळत होती. मुलीची आई आशा देवी हिने तिला खेळण्यास मनाई केली होती. अनेकवेळा तिला घरी बोलावले, मात्र मुलगी आली नाही.

यावर तिची आई आशा देवी हिला प्रचंड राग आला. रागाच्या भरात तिने प्रथम मुलीला मारहाण केली त्यानंतर तिच्यावर सॅनिटायझर ओतले. ती मुलाला घाबरवत होती, त्याच दरम्यान त्याला आग लागली. ती मुलीला घाबरवत होती मात्र याचदरम्यान आग लागली व ज्यामध्ये मुलगी मोठ्या प्रमाणावर गंभीर जखमी झाली. मुलीला रुग्णालयात नेल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. (हेही वाचा: Bengaluru Shocker: वडिलांच्या हत्येची सुपारी देणाऱ्या मुलाला बंगळूरुत अटक)

याबाबत सीओ मोहसीन खान यांनी सांगितले की, आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. महिलेच्या अटकेसाठीही प्रयत्न सुरू असून लवकरच आरोपी आईला अटक करून कारागृहात पाठवण्यात येईल.