बंगळूरु पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्यावर आपल्या वडीलांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप आहे. मनिकांता हे बंगळूरुमधील माराथल्ली परिसरात राहत असून आपले वडिल 70 वर्षीय नारायणस्वामी यांच्या हत्येसाठी 1 कोटीची सुपारी दोन जणांना दिली होती. नारायणस्वामी यांच्या संपत्तीसाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे समोर येत 13 फेब्रुवारी रोजी त्यांची इमारतीच्या पार्किंगमध्ये हत्या करण्यात आली होती. मनिकांता ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असेलेला व्यक्ती आहे.
आपल्या पहिल्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांने तुरुंगवास देखील भोगला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांने दुसऱ्या महिलेशी लग्न केले त्यांना एक मुलगीही आहे पण दुसऱ्या पत्नी पासून देखील तो वेगळा राहु लागला. पत्नीने त्याच्यावर विवाहबाह्य संबधाचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांने आपल्या पत्नीवर हल्ला देखील केला होता यानंतर दुसऱ्या पत्नीने तक्रार नोंदवत घटस्फोटासाठी देखील अर्ज केला होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी मनिकांताचे वडिल नारायणस्वामी हे पैसे देणार होते, पण मनिकांत या गोष्टीच्या विरोधात होता. त्यांने आपल्या वडिलांच्या हत्येची सुपारी देत त्यांना 1 लाख एडव्हॉन्स ही दिले होते.
Bengaluru: Man Hires ‘Supari Killers’ For Rs 1 Crore to Murder Father Over Property Dispute, Arrested #Bengaluru #Crime #CrimeNews https://t.co/3QGmUyhgzN
— LatestLY (@latestly) February 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)