Dharam Singh Saini | (Photo Credit: Twitter)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election 2022) हळूहळू रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाला हादरे बसू लागले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमधून एक एक मंत्री राजीनामा देत बाहेर पडताना पाहायला मिळते आहे. योगी सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याने आज राजीनामा दिला. धर्म सिंह सैनी (Dharam Singh Saini) असे या मंत्र्याचे नाव आहे. या आधी स्वामी प्रसाद मौर्य आणि दारा सिंह चौहान या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. प्राप्त माहितीनुसार आदित्यनाथ यांनी फोन करुन धर्म सिंह सैनी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तरीही सैनी यांनी आज (13 जानेवरी) अखिलेश यादव यांच्याशी संवाद साधला.

पाठीमागील तीन दिवसांपासून योगी सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामास्त्र सुरु केले आहे. यात प्रामुख्याने ओबीसी समुदायातून येणाऱ्या मंत्र्यांचा समावेश आहे. सैनी हे पश्चिम उत्तर प्रदेशमधील सहारनपुर येथील नकुड विधानसभा मतदारसंघातून येतात. सैनी यांनी 24 तसांपूर्वीच दावा केला होता की, ते भाजप सोडत नाही आहेत. दरम्यान, आतापर्यं मंत्र्यांशिवाय आतापर्यंत 5 आमदारही भाजपमधून बाहेर पडले आहेत. (हेही वाचा, Dara Singh Chauhan Resigns: भाजपचा पाय खोलात, युपीमध्ये योगी सरकारमधील दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा)

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी धर्म सिंह सैनी यांच्याशी झालेल्या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये 'मेला होबे' हा हॅशटॅग वापरला आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की, 'सामाजिक न्यायातील एक योद्धा आणि डॉ. धर्म सिंह सैनीजी यांच्या आगमनामुळे सर्वांना सोबत घेऊन जाणारी आमची राजनीती सकारात्मक आणि प्रगतीशिल होईल. त्यात उत्साह येईल. त्यांचा सन्मानाने आणि हृदयपूर्व स्वागत करतो.'

दारा सिंह चौहान यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, मी पूर्ण क्षमतेने काम केले. मात्र, मागास, वंचित आणि दलित वर्ग, शेतकरी आणि बेरोजगारांना या सरकारने काहीच दिले नाही. सरकारचा या सर्व वर्गांविरोधात कारभार आहे. सरकारचे मागास आणि दलिदांबाबत असलेल्या भूमिकेमुळे त्रस्त होऊन आपण राजीनामा देत आहोत.

ट्विट

योगी सरकारमध्ये मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मोर्य यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिला होता. मोर्य हे उत्तर प्रदेश राज्यातील एक प्रमुख ओबीसी चेहरा मानले जातात. त्यांच्यासोबत भाजपच्या चार आमदारांनीही राजीनामा दिला आहे यात जिनमें बृजेश प्रजापति, रोशन लाल, भगवती सागर, आणि विनय शाक्य यांचा समावेश आहे. मौर्य यांनी मायावती यांचा बसप सोडत 2017 मध्ये भाजप पक्षात प्रवेश केला होता.