उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अलीगढ येथे विषारी दारु प्यायल्याने 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की, मृतांमध्ये एपची गॅस प्लांटच्या ट्रक ड्रायव्हरचा सुद्धा समावेश आहे. या व्यतिरिक्त लोध क्षेच्कातील करसुआ, निमाना, हैवतपुर, अंडला गावातीला लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप काही लोकांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(बाबो! Covid-19 चा नाश करण्यासाठी भाजप आमदार Abhay Patil यांनी केले होम-हवन; शहरभर काढली मिरवणूक Watch Video)
अलीगढ गावात विषारी दारुमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. त्याचसोबत लोक संतप्त सुद्धा झाले आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी चंद्र भुषण सिंह यांनी म्हटले की, आतापर्यंत 7 जणांचा बळी गेला आहे. या प्रकरणी तपास सुरु आहे. तपासाअंती जो काही निकाल येईल त्याच्या आधारावर कार्यवाही केली जाणार आहे. (कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या 67 पत्रकारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून मिळणार 5 लाख रुपयांची मदत)
काय आहे नेमके प्रकरण?
अलीगढ येथील थाना लोध क्षेत्राताअंतर्गत गाव करसुआ मध्ये विषारी दारु प्यायल्याने सात जणांचा जीव गेला आहे. स्थानिकांनी असे म्हटले की, त्यांनी गावातील दुकानातूनच दारु खरेदी केली होती. यामध्ये एक ट्रक ड्रायव्हरचा सुद्धा समावेश आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी पोहचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
गावातील नागरिकांनी तक्रार केल्यानंतर प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी गावातील दारुचे दुकान सील केले आहे. त्याचसोबत दारुचे सॅम्पल एकत्रित केले आहे. तपासानंतरच समोर येईल की लोकांचा मृत्यू नेमका कसा झाला. तसेच दुकानातच विषारी दारु विक्री केली जात होती? याच दरम्यान गावातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.