हत्या आणि वसूली सारख्या गुन्ह्यांपासून पळ काढत देश सोडून पळालेला अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारी (Ravi Pujari) याला 15 वर्षानंतर भारतात आणण्यात आले आहे. सोमवारी सकाळी फ्रान्सच्या रस्त्याने सेनेगल येथून बंगळुरु येथे आणले आहे. तर सध्या पुजारी याची बंगळुरु मधील मादीवाला येथे त्याची चौकशी करण्यात येत आहे. तसेच आज त्याला कोर्टात सादर करण्याची शक्यता आहे. पुजारा याच्यावर हत्या आणि खंडणीप्रकरणी त्याच्यावर 40 पेक्षा अधिक खटले आहेत. तर गेल्या महिन्यात अफ्रिकेतून पुजारी याला अटक करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्स नुसार, अटक करण्यात आल्यानंतर अचानक पुजारा हा गायब झाला होता. असे सांगितले जात आहे की, पुजारी याला कर्नाटक पोलीस आणि सेनेगल अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत एका गावातून त्याला अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी सेनेगल सुप्रीम कोर्टाने पुजारी याचा प्रत्यार्पणासाठी दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर पुजारा याच्याकडे कोणताच कायदेशीर मार्ग शिल्लक राहिला नव्हता. पोलिसांच्या सुत्राने असे सांगितले की, पुजारा याने जामिनाचे उल्लंघन करत सेनेगल येथून पळून दक्षिण अफ्रिकेत पोहचला होता.(मोठी कामगिरी: अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक; 15 वर्षांपासून होता फरार)
रवी पुजारी जवळजवळ 15 वर्ष भारतातून फरार होता. पोलिसांकडून खंडणी, हत्या, धमकावणे आणि घोटाळ्यासंबंधित प्रकरणात त्याचा शोध घेण्यात येत होता. पुजारा याच्यावर बॉलिवूडच्या अनेक स्टार्सकडून खंडणी मागितल्याची प्रकरणे आहेत. सुमारे 200 प्रकरणात त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली आहे. गेल्या महिन्यात कर्नाटक पोलिसांनी रवि पुजारीचा जवळचा सहकारी आकाश शेट्टी याला अटक करण्यात आली होती.