Handwara Encounter: लश्कर ए-तैयबा चा टॉप कमांडर 'हैदर' चा खात्मा; भारतीय सैन्याला मोठे यश
Representational Image (Photo Credit: PTI)

जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मधील हंदवाडा (Handwara) येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमकीत सुरु होती. या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले तर लष्कर ए-तोयबाचा (Lashkar-e Taiba) टॉप कमांडर हैदर ठार झाला आहे. काश्मीर  IG विजय कुमार (Vijay Kumar) यांनी ही माहिती दिली आहे. हैदरचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आले असले तरी यात 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 4 जवान शहीद झाले आहेत. तर शहीदांमध्ये एका पोलिस इन्स्पेक्टरचाही समावेश आहे. राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद हे या चकमकीत शहीद झाले आहेत. (Jammu & Kashmir: हंडवारा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासहित 3 जवान व 1 पोलिस उपनिरीक्षक शहीद)

हंडवाडा येथे दहशतवाद्यांनी एका घरात काही लोकांना डांबून ठेवले असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यांच्या सुटकेसाठी सुरक्षारक्षक आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी शनिवारी संयुक्त अभियान चालवले होते.

ANI Tweet:

दहशतवाद्यांनी नागरिकांना घरात कोंडून ठेवले असल्याची माहिती मिळताच 21 राष्ट्रीय रायफल्सच्या  टीमने रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली. नागरिकांना सोडवण्यासाठी चाल करत घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी हल्ला करुन या घरांमध्ये लोकांना अपहरण करुन ठेवले होते. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 4 जवानांनी आपले प्राण गमावले परंतु, घरात अडकलेल्या नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली.