21 Rashtriya Raifale Commanding Officer Colonel Major Ashutosh Sharma (Photo Credits: ANI)

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) हंडवारा येथील दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये आज, (रविवार 3  मे) रोजी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे चार जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात 21 राष्ट्रीय रायफल्स कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा (Colonel Ashutosh Sharma) हे शहीद झाल्याचे समजतेय यापुर्वी त्यांंनी अनेक यशस्वी दहशतवादविरोधी ऑपरेशन मध्ये मोलाची कामगिरी केली होती. तर याशिवाय भारतीय सैन्याचे 4 सैनिक तसेच जम्मू-काश्मीर पोलिस उपनिरीक्षक  या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहे. तर याच हल्ल्यात 2 अतिरेक्यांना सुद्धा ठार करण्यात सैन्याला यश आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील हंडवारा येथे सुरक्षा दलातील आणि दहशतवाद्यांच्यात रविवारी पहाटेच्या सुमारास चकमक सुरु झाली होती. यावेळी गोळीबार सुरु होताच बचावासाठी 21 राष्ट्रीय रायफल्सचे पथक यावेळी एका नागरिकाच्या घरात शिरले होते, मात्र या घरात काही दहशतवादी अगोदरच घुसून बसले होते, त्यामुळे पथकावर या अतिरेक्यांना गोळीबार करण्याची संधीच मिळाली ज्याला कर्नल आशुतोष शर्मा यांच्या सहित हे चार सैनिक बळी पडले. या हल्ल्याच्या आधी या घरातील नागरिकांना मात्र सैन्याने सुरक्षित बाहेर काढले होते.

ANI ट्विट

काश्मीर झोन पोलिसांनी शनिवारी सांगितले की, 2 मे रोजी संध्याकाळी हंदवाडाच्या चंजमुल्ला भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकीला प्रारंभ झाला होता. तसेच जम्मू-काश्मीर मधील डेंजरपोरा भागात सुद्धा शनिवारी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती ज्यात दोन अज्ञात दहशतवादी ठार करण्यात सैनिक यशस्वी ठरले होते.