Tik Tok Star Gets Coronavirus (Photo Credits: Twitter)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मधील टिक-टॉक (Tik Tok) स्टार (नाव गुप्त) ला कोरोनाची लागण (Coronavirus) झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या स्टारने काही दिवसांपूर्वी आपल्या टिकटॉक अकाउंटवर एक आक्षेपार्ह्य व्हिडीओ बनवत मास्कची थट्टा केली होती. जगभरावर कोरोनाचे संकट असताना प्रत्येक देश, देशातील प्रत्येक व्यक्ती हा मास्क घालून स्वसंरक्षण करावे असे सांगताना दिसत आहे तिथे या महाभागाने या एवढ्याश्या विषाणूला घाबरून तुम्ही मास्क काय घालता जर तुमचे रक्षण करायचे असेल तर त्यासाठी देवाकडे प्रार्थना करा अशा आशयाचे डायलॉग मारत आपला टिकटॉक बनवला होता, आणि त्यांनतर आता काहीच दिवसात त्याची कोरोना चाचणी केली असता हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आश्चर्य म्हणजे आता या स्टारने आपला सुर एकाएकी बदलून तुम्हाला स्वतःचे रक्षण करायचे असेल तर मास्क नक्की वापरा असे आवाहन आपल्या फॉलोअर्सना केले आहे. हे दोन्ही व्हिडीओ एका ट्विटर युझरने शेअर केले असून आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. Fact Check: 10 सेकंद श्वास रोखून धरणाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण होत नाही? काय आहे या व्हायरल मेसेज मागील सत्य?

संबंधित टिकटॉक स्टार हा मध्यप्रदेशच्या एका छोट्या जिल्ह्यातील राहणारा असून त्याठिकाणी कोरोनाची लागण झालेला हा पहिलाच व्यक्ती आहे. भोपाळच्या एम्स रुग्णालयात चाचणी केली असताना त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्याला बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णालयात मास्क घालून त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने "मी आजारी असल्याने आता तुमच्या सोबत नवे व्हिडीओ शेअर करू शकत नाही मात्र तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या, मास्क वापरा, आणि माझ्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी नक्की प्रार्थना करा" असे म्हंटले आहे.

काय आहे हा टिकटॉकचा व्हायरल व्हिडीओ

दरम्यान, या तरुणाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचे घर असणारा संपूर्ण भाग हा सील करण्यात आला आहे. त्याच्यासोबतच आता त्याच्या कुटुंबाची सुद्धा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. सद्य घडीला देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अजूनही वाढताना दिसून येत आहे, मागील २४ तासात रुग्णानाचा आकडा 909 ने वाढून रुग्णांची एकूण संख्या ही 8356 वर गेली आहे.