चेकच्या माध्यमातून पेमेंट करतेवेळी होणाऱ्या फसवूकीला आळा घालण्यासाठी भारतीय रिजर्व बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टिम 1 जानेवारी 2021 पासून लागू केला होता. मात्र आता 15 ऑगस्ट पासून ती आता अनिवार्य केली जाणार आहे. पब्लिक सेक्टरच्या इंडियन बँकेने आपल्या ग्राहकांना या प्रकारचे अलर्ट पाठवणे सुरु झाले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून असे सांगितले आहे की, 15 ऑगस्ट 2021 ते 2 लाख रुपयांपर्यंतचे अधिक चेकवर पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू करण्यात येणार आहे.
खरंतर चेक फ्रॉड प्रकरणे मोठ्या संख्येने आल्यानंतर आरबीायने पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टिम संबंधित गाइडलाइन्स जाहीर केल्या होत्या. ती 1 जानेवारी 2021 पासून लागू केले होते. आरबीआयने बँकांना असे म्हटले की, 50 हजार रुपये किंवा अधिक रक्कम असणाऱ्या चेक देणाऱ्या सर्व अकाउंट होल्डर्ससाठी ही सुविधा लागू केली जाणार आहे.(RBI चे व्याजदर जैसे थे; Reverse Repo Rate 3.35%, Repo Rate 4%; Governor Shaktikanta Das यांची माहिती)
आरबीआयने असे ही म्हटले की, बँक आपल्याकडून ही सुविधा 5 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कमसाठी अनिवार्य करु शकतात. आरबीआयच्या गाइडलाइन्सनुसार, इंडियन बँकने चेकच्या माध्यमातून 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक पेमेंटवर ही सुविधा लागू केली होती. आता इंडियन बँक आता ही 15 ऑगस्टपासून अनिवार्य करणार आहे.
पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टिम ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने तयार केली आहे. या सिस्टिम अंतर्गत अधिक रक्कमेची देवाणघेवाण करणाऱ्या ग्राहकांना आपल्या चेक बद्दल काही महत्वाची माहिती बँकेला द्यावी लागते. त्यानंतर हे चेकचे पेमेंट क्लिअर करतेवेळी हे डिटेल्स पाहिले जातात. कोणतीही समस्या किंवा डिटेल्स न मिळाल्याच्या स्थितीत पेमेंट थांबवले जाते.
इंडियन बँकेने असे म्हटले की, आपल्या ग्राहकांना आपला अकाउंट नंबर, चेक नंबर, जाहीर करण्याची तारीख, ट्रांजेक्शन कोड, एमआयसीआर कोड बँकसह जाहीर करावा लागणार आहे. हे डिटेल्स चेक क्लिअरिंगला पाठवण्यापूर्वी 24 सात आधी सांगावे लागतात. बँक ग्राहक ही माहिती वेबासाइट, इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग किंवा होम ब्रांचमध्ये जाऊन देऊ शकतात.