Rafale Fighter Aircraft: राफेल फायटर विमान ताफ्याचा भारतीय हवाई हद्दीत प्रवेश, काही मिनिटांतच अंबाला एअरबेसवर लँडींग- राजनाथ सिंह
Rafale Fighter Aircraft | (Photo Credits: RMO India)

अखेर तो क्षण आला. राफेल फायटर वमाने (Rafale Fighter Aircraft) भारतीय हवाई हद्दीत दाखल झाली आहेत. राफेल लढावू विमानांचा पहिल्या टप्प्यातील पाच विमानांचा एक ताफा भारतीय हवाई हद्दीत दाखल झाला. या ताफ्यास भारतीय नौदलाने ‘हॅप्पी लँडिंग’ अशा शुभेच्छाही दिल्या. तसेच, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनीही ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. दरम्यान,फ्रान्समध्ये खास प्रशिक्षण पूर्ण केलेले भारतीय वैमानिक ही विमाने घेऊन भारतात दाखल होत आहेत. या वैमानिकांना आणि त्यांच्या क्रू मेंबर्सच्या टीमला ही विमाने कशी हाताळायची याबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे. फ्रान्सकडून भारताला एकूण 36 राफेल लढावू विमाने मिळणार आहेत. त्याबाबतचा करार उभय देशांमध्ये 2016 मध्येच झाला आहे.दोन्ही देशांमध्ये 59 हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे.

अतीशय वेगवान आणि शक्तीप्रधान अशी ही विमाने पुढच्या काही मिनिटांमध्येच हरीयाणा येथील अंबाला एअरबेसवर येथे लँड होतील. यूएईच्या अल धफ्रा बेसवरुन उड्डाण केल्यावर या ताफ्याने भारताकडे कूच केले होते. (हेही वाचा राफेल फायटर जेट्सचा अरबी समुद्राच्या हद्दीमध्ये प्रवेश होताच INS Kolkata सोबत संपर्क; ऐका हा खास Audio)

दरम्यान, राफेल विमानांचे स्वागत करण्यासाठी भारतीय नौदलाची एक तुकडी पश्चिम अरबी समुद्रात तैनात होती. या ताफ्याने यूएईच्या अल धफ्रा बेसवरुन उड्डाण केल्यावर भारतीय नौदलाच्या या INS कोलकात्ता या युद्धनौकेशी संपर्क साधला.

दरम्यान, राफेल लढावू विमानांनी फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन सोमवारी सकाळी उड्डाण भरले होते. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर या विमानांनी काही काळ विश्रांती घेतली. त्यानंतर या विमानांनी आज सकाळी पुन्हा उड्डाण भरले आणि ही विमाने भारतीय हवाई हद्दीत दाखल झाली. राफेल विमानांचा पहिल्या ताफ्यात एकूण पाच विमाने आहेत. यातील तीन विमाने सिंगल सीटर आहेत. तर दुसरी दोन डबल सिटर आहेत.